ही हत्या दुसरी तिसरी कुणी नव्हे तर जावयानेच केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. माया मदन पसेरकर असं हत्या झालेल्या ५० वर्षीय महिलेचं नाव आहे. जावई मुस्तफा खान याने हत्या केल्याचं आता समोर आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. आरोपीनं पैशांच्या वादातून ही हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत माया पसेरकर यांनी दोन विवाह केले होते. त्यांना एक सावत्र मुलगी होती. सावत्र मुलगी गीता हिने मुस्तफा खान नावाच्या तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. काही दिवसांपूर्वी मयत माया यांनी जावई मुस्तफा याच्याकडून पाच लाख रुपये घेतले होते. पण माया पैसे परत देत नव्हत्या. यामुळे मागील अनेक दिवसांपासून सासू आणि जावयामध्ये वाद सुरू होता. याच वादातून जावई मुस्तफा याने सासू माया पसेरकर यांच्या हत्येचा कट रचला.
घटनेच्या दिवशी बुधवारी दुपारी जावई मुस्तफा याने माया यांचा पाठलाग सुरू केला. घरापासून काही अंतरावर दूर गेल्यानंतर त्याने रस्त्यात सासूला गाठलं आणि चाकू भोसकून हत्या केली. आरोपीनं माया यांचा गळा देखील चिरला. हा सगळा प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आरोपी पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आला होता. पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
