दर शनिवार रविवारी कलर्स मराठी वाहिनीवर भाऊचा धक्का एपिसोड प्रदर्शित केला जातो. पण आजचा 'बिग बॉस मराठी'च्या भाऊचा धक्का एपिसोड आणखीनच खास झाला आहे. कारण आज या एपिसोडमध्ये ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा ग्रँड फर्स्ट लूक टीझर रिलीज झाला आहे. आज, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर हा टीझर आपल्याला पाहायला मिळाला.
advertisement
अंगावर शहारे आणणारा अनुभव
'राजा शिवाजी' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा महान इतिहास आणि त्यांचा स्वराज्य स्थापनेचा प्रवास या चित्रपटातून भव्य दिव्य रूपात मांडण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा सोशल मीडिया टीझर समोर आला होता, जो पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते. आता या चित्रपटाची अधिकृत पहिली झलक थेट टीव्हीवर प्रदर्शित करून रितेश देशमुखने चाहत्यांना मोठी भेट दिली आहे.
१ मे २०२६ ला होणार ऐतिहासिक धमाका
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, म्हणजेच येत्या १ मे २०२६ रोजी 'राजा शिवाजी' संपूर्ण जगात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रितेशने याचे दिग्दर्शन केले नसून, तो स्वतः या ऐतिहासिक भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज मराठी आणि हिंदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
