आपल्या आवाजाने सगळ्या प्रेक्षकांना वेड लावणारा अभिजीत सावंत आता 'मी होणार सुपरस्टार उस्ताद' या रिॲलिटी शोमध्ये झळकणार आहे. या शोच्या महाअंतिम सोहळ्याला तो हजेरी लावणार असून याचा प्रोमो व्हिडिओ व्हायरल होतोय.
मालतीचा चेहरा आधी दाखवला मग आता का लपवतेय? देसी गर्लच्या लेकीला लागली कुणाची नजर?
'मी होणार सुपरस्टार उस्ताद-छोटे उस्ताद' तिसऱ्या सीझनचा महाअंतिम सोहळा होणार आहे. शनिवार, 9 आणि रविवार, 10 नोव्हेंबरला हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी अभिजीत सावंतची खास हजेरी लावणार आहे. तो त्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात गाणीही गाताना दिसणार आहे. प्रोमो आऊट होताच अभिजीतचे चाहते त्याला पुन्हा एकदा रिॲलिटी शोमध्ये गाताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
advertisement
दरम्यान, अभिजीत सावंत बिग बॉस मराठी 5 च्या टॉप 2 मध्ये पोहोचला. मात्र ट्रॉफी त्याच्या हातून निसटली. यंदाच्या सीझनचा विनर गोलीगत सूरज चव्हाण ठरला. सूरजसोबत अभिजीत सावंतलाही लोकांचं प्रेम मिळालं. आता अभिजीत पहिल्यापेक्षा जास्त सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. तो त्याच्याविषयी नवनवीन अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो.
