2024 ला घटस्फोट, एका वर्षानंतर केलं जाहीर; राहुल देशपांडेंनी सांगितलं कारण
नेहा आणि राहुल यांच्या घटस्फोटानंतर रेणुकाचा सांभाळ कोण करणार ? या प्रश्नांचं उत्तर स्वत: राहुल यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना दिलं आहे. काही तासांपूर्वी राहुल यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "मला आणि नेहाला घटस्फोटाबद्दलची माहिती शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घ्यावा असे वाटले, जेणेकरून हा बदल मी खासगीपणे स्वीकारू शकेन आणि सर्व काही काळजीपूर्वक हाताळले जाईल. विशेषतः आमची मुलगी रेणुकाच्या सर्वोत्तम हितासाठी. तिचं माझं सर्वोच्च प्राधान्य आहे. माझी मुलगी रेणुका हिच्यासाठी मी नेहमी नेहासोबत प्रेम, साथ आणि स्थैर्याने सहपालन करण्यास वचनबद्ध आहे. आता आमच्यासाठी स्वतंत्र व्यक्ती म्हणून एका नव्या अध्यायाची सुरुवात असली तरी, पालक म्हणून आमचे नाते आणि एकमेकांबद्दलचा आदर कायम मजबूत राहील."
advertisement
राहुल देशपांडेंचा घटस्फोट, 17 वर्षानंतर संसाराचे सूर बिघडले
दरम्यान, राहुल आणि नेहा यांनी 22 नोव्हेंबर 2008 साली लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या 17 वर्षांनंतर त्यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा घेतला आहे. असंख्य गोड आठवणींनंतर, नेहा आणि राहुल यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. घटस्फोटानंतर आता दोघेही आपआपले स्वतंत्रपणे जीवन जगत आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये नेहा आणि राहुल कायदेशीर विभक्त होणे शांततेत आणि परस्पर समजुतीने पूर्ण झाले.