Cancer Care: तुम्हालाही वाटतेय कॅन्सरची भीती? फक्त या सवयी बदला, मिटेल चिंता

Last Updated:

Prevent Cancer: सध्याच्या काळात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. तुम्हाला देखील कर्करोगाची भीती वाटत असेल, तर लगेच जीवनशैलीतील काही सवयी बदलाव्या लागतील.

+
Prevent

Prevent Cancer: तुम्हालाही वाटतेय कॅन्सरची भीती? जीवनशैलीतील करा हे बदल, मिटेल चिंता

पुणे: गेल्या काही वर्षांत कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, या वाढीमागे आपल्या जीवनशैलीतील काही सवयी कारणीभूत ठरत आहेत. अति ताणतणाव, पुरेशी झोप न घेणे, फास्ट फूडचे अति सेवन अशा सवयींमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि कॅन्सरचा धोका वाढतो. आपल्या जीवनशैलीतील कोणते बदल केल्यानंतर कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारापासून चार हात दूर राहता येऊ शकतं, याविषयी कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी लोकल 18 ला सविस्तर माहिती दिली आहे.
रात्री झोपण्याआधी मोबाईलचा वापर धोकादायक
आपल्यापैकी अनेक जण 8 तासांची झोप घेत नाहीत. झोपेअभावी शरीरावर गंभीर परिणाम होतात आणि कॅन्सर सारख्या आजाराचा धोका वाढतो, असे डॉ. प्रतिक पाटील सांगतात. कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर दररोज 8 तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपताना अनेकजण मोबाईल शेजारी ठेवतात, पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे झोपताना मोबाईल दूर ठेवावा, तसेच झोपण्याच्या किमान एक तास आधी आणि सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईलचा वापर टाळावा, असा सल्ला त्यांनी दिला.
advertisement
आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार घ्या
आरोग्य टिकवण्यासाठी आहारात काही बदल करण्याची गरज असल्याचंही डॉ. पाटील सांगतात. त्यांच्या मते, दैनंदिन आहारामध्ये साखरेचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळे व पालेभाज्या नियमितपणे खाव्यात.
advertisement
बाहेरून आणलेल्या पालेभाज्या व फळे मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून मगच खाव्यात. यासोबतच ताणतणाव टाळणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हे देखील कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देखील ते देतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cancer Care: तुम्हालाही वाटतेय कॅन्सरची भीती? फक्त या सवयी बदला, मिटेल चिंता
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement