TRENDING:

अमृताची मुंबईत 3 घरं! एकात त्रास, दुसरं 'वास्तू'नुसार सजवलं; म्हणे, इथं मल्टिप्लाय होतं जेवण, पण कसं?

Last Updated:

Amruta Khanvilkar Home : अमृताने खरेदी केलेलं तिचं हे नवं घर तिने खूप विचार करून घेतलं आहे. घरातील प्रत्येक कोपरा सजवताना तिने वास्तू शास्त्राचा विचार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर हिने काही महिन्यांआधीच मुंबईत स्वत: नवं घर खरेदी केलं. गुढीपाडव्याच्या दिवशी अमृताने या घरात पूजा केली. ती स्वत: या पूजेला बसली होती. अमृताने तिच्या घराची छोटी झलक देखील सर्वांबरोबर शेअर केली होती. अमृताने खरेदी केलेलं तिचं हे नवं घर तिने खूप विचार करून घेतलं आहे. घरातील प्रत्येक कोपरा सजवताना तिने वास्तू शास्त्राचा विचार केला आहे.वास्तू शास्त्रज्ञांचा सल्ला घेतला आहे. अमृताने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.
News18
News18
advertisement

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अमृताने तिच्या नवऱ्या घराबद्दल सांगताना तिच्या जुन्या घरांविषयी देखील सांगितलं. अमृता म्हणाली,"अमृताचं मुंबईतील हे तिसरं घरं आहे. तिने सांगितलं, 'माझं पहिलं घरं होतं तिथे माझी मम्मी राहते. ते साधारण तिचंच घर आहे. जे निर्वाणला ( अमृताच्या बहिणीचा मुलगा ) जाणार आहे. आणि मावशीचं घर आहे जे नुर्वीला ( अमृताच्या बहिणीची मुलगी ) मिळणार आहे."

advertisement

( Shriya Pilgaonkar : 'मला मेंटली जेवण बनवता येतं', श्रिया पिळगावकरचा व्हिडीओ पाहून व्हाल शॉक )

अमृताने तिच्या दुसऱ्या घराविषयी सांगितलं. ती म्हणाली, "त्यानंतर माझं एक घर होतं ते लोखंडवालाल होतं. पण तिथे कोविड खूप जास्त प्रमाणात होता. आम्हाला वास्तूचे काही प्रोब्लेम्स आले. त्यातून निघताना आमची खूप दमछाक झाली."

advertisement

अमृता पुढे म्हणाली, "वास्तू प्रोब्लेम झाल्यानंतर मी ठरवलं की जर मला घर घ्यायचं असेल तर मी डेफिनेटली वास्तूच्या हिशोबाने घेईन. आमचे एक सर आहेत त्यांना विचारून मी हे सगळं केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की कोणत्या रूमध्ये कोणते कलर. कुठे काय करायचं आहे. त्या हिशोबाने मी केलंय."

advertisement

अमृताने तिच्या घरातील तिची आवडीची जागा देखील सांगितली. ते सांगताना ती म्हणाली, "माझी एकच हट्टाची जागा होती त्याला त्यांनी ओके दिला ती जागा म्हणजे डायनिंग टेबल. मला इथे एक आरसा हवा होता. अभिनेत्री आणि डान्सर असल्याने माझ्या घरात खूप आरसे आहेत. त्यांनी हा कोपरा अप्रुव्ह केला. त्यांना मी रिक्वेस्ट केली. त्यांनी विचार केला आणि इथे आरसा लावू शकता असं सांगितलं."

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

अमृता पुढे म्हणाली, "मला असं नेहमी वाटतं की, तुम्ही जेव्हा डायनिंग टेबलवर जेवता तेव्हा ते जेवण मल्टिप्लाय होतं. घरात सुख, समृद्धी, भरभराट होते."

मराठी बातम्या/मनोरंजन/
अमृताची मुंबईत 3 घरं! एकात त्रास, दुसरं 'वास्तू'नुसार सजवलं; म्हणे, इथं मल्टिप्लाय होतं जेवण, पण कसं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल