TRENDING:

अनिल कपूर-हरभजन सिंगचं जबरदस्त कोलॅब, 'सूबेदार'चं नवं अँथम सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ! VIDEO VIRAL

Last Updated:

New Anthem of Subedar: प्राइम व्हिडिओने प्रदर्शित केलेला 'द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार' हा केवळ एक म्युझिक व्हिडिओ नसून भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक एनर्जी डोस आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मैदानावर जेव्हा भारतीय क्रिकेट संघ उतरतो, तेव्हा मैदानात केवळ अकरा खेळाडू नसून अख्खा देश त्यांच्या पाठीशी उभा असतो. हाच जोश, अभिमान आणि शत्रूच्या मनात धडकी भरवणारा आत्मविश्वास घेऊन आला आहे बॉलीवूडचा 'झक्कास' अभिनेता अनिल कपूर. निमित्त आहे त्याच्या आगामी 'सूबेदार' या चित्रपटातील 'लल्ला अँथम'चे. विशेष म्हणजे, या गाण्यात भारताचा लोकप्रिय बॉलर हरभजन सिंग सुद्धा मैदानात उतरला असून, दोघांनी मिळून टीम इंडियाशी भिडणाऱ्यांना थेट इशारा दिला आहे.
News18
News18
advertisement

प्राइम व्हिडिओने प्रदर्शित केलेला 'द लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार' हा केवळ एक म्युझिक व्हिडिओ नसून भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी एक एनर्जी डोस आहे. विशाल ददलानी यांच्या पहाडी आवाजात गायलेल्या या गाण्याला रोहन-विनायक यांनी संगीत दिले आहे. या व्हिडिओमध्ये अनिल कपूरचा रांगडा अवतार, राधिका मदानची जबरदस्त एन्ट्री आणि शेफाली बग्गासह भारत आर्मीचा उत्साह गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो.

advertisement

अनिल कपूर यांच्या सूबेदारमध्ये हरभजन सिंगची एन्ट्री

या चित्रपटात अनिल कपूर 'अर्जुन मौर्य' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. अर्जुन हा एक असा माणूस आहे जो शिस्त, स्वाभिमान आणि नैतिक मूल्यांना सर्वात वर मानतो. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात सूबेदार अर्जुन मौर्यचा शांत पण तेवढाच आक्रमक प्रवास पाहायला मिळणार आहे. अनिल कपूर या गाण्याबद्दल म्हणतात, "सूबेदार अर्जुन मौर्य शांत असला तरी योग्य वेळी तो शत्रूचा घास घ्यायला मागेपुढे पाहत नाही. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या टीमने केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे."

advertisement

हरभजन सिंग या गाण्यात एका विशेष भूमिकेत दिसत आहे. अनिल कपूरसोबत काम करण्याच्या अनुभवावर बोलताना भज्जी म्हणाला, "अनिल कपूर ही एक चालती-बोलती संस्था आहे. त्यांची ऊर्जा आजही थक्क करणारी आहे. 'लल्ला अँथम'मधील बीट्स इतके पावरफुल आहेत की ते सध्याच्या क्रिकेट सीझनला साजेसे आहेत."

कधी रिलीज होणार फिल्म?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

प्रसिद्ध दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, ज्यांनी 'तुम्हारी सुलु' आणि 'जलसा' सारखे चित्रपट दिले आहेत, त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'सूबेदार' हा चित्रपट ५ मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषेतही हा अ‍ॅक्शन-ड्रामा जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये पाहता येणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
अनिल कपूर-हरभजन सिंगचं जबरदस्त कोलॅब, 'सूबेदार'चं नवं अँथम सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ! VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल