TRENDING:

Subedar Trailer: 90's चा सुपरस्टार आघाडीच्या कलाकारांवर भारी पडला, 'सुबेदार'चा जबरदस्त ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

Last Updated:

बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन अनिल कपूर सध्या 'सुबेदार' चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झालेला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बॉलिवूडचा अँग्री यंग मॅन अनिल कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे कमालीचा चर्चेत आला आहे. 'सुबेदार' चित्रपटातून 90 च्या दशकामध्ये लोकप्रिय झालेला अनिल कपूर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या या ट्रेलरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून अनिल कपूरसह चित्रपटातल्या इतर कलाकारांचीही सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
Subedar Movie Trailer Released
Subedar Movie Trailer Released
advertisement

भारतामध्ये काही ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणावर हा चित्रपट आधारित आहे. संघर्ष, सत्ता आणि धमाकेदार ॲक्शन यांचा मिलाप असलेला 'सुबेदार' चित्रपट आहे. अभिनेता अनिल कपूर सूबेदार अनिल मोर्याच्या भूमिकेत असून त्यासोबत राधिका मदान, मोना सिंग, आदित्य रावल आणि सौरभ शुक्ला हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 'सुबेदार' चित्रपट 5 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत संपूर्ण भारतात आणि जगभरात प्रदर्शित होणार आहे.

advertisement

ट्रेलरमध्ये चित्रपटातील अनेक लक्षवेधक सीन्सची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. जे आपल्याला सुबेदारच्या रहस्यमयीन जगात घेऊन जाते. जिथे बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे, अशा ठिकाणापासूनच ट्रेलरची सुरूवात होते. भयान शांतता असलेल्या या परिसरामध्ये, रिटायर्ड सुबेदार अर्जुन मौर्य आपल्या भूतकाळाच्या ओझ्याने घरी परततो. त्याला एका प्रिन्सची आणि दीदीची भेट होते. हे दोघेही खलनायकाच्या भूमिकेत आहेत. ट्रेलरमधल्या सर्वच डायलॉग्सने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. खुर्चीला खिळवून ठेवणारं हे कथानक सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

या चित्रपटाची कथा सुरेश त्रिवेणी आणि प्रज्वल चंद्रशेखर यांनी लिहिली आहे. यात अनिल कपूर आणि राधिका मदान मुख्य भूमिकेत झळकणार असून सौरभ शुक्ला, आदित्य रावल, फैजल मलिक आणि मोना सिंह या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘सुबेदार’चित्रपट 5 मार्च रोजी प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Subedar Trailer: 90's चा सुपरस्टार आघाडीच्या कलाकारांवर भारी पडला, 'सुबेदार'चा जबरदस्त ट्रेलर तुम्ही पाहिलात का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल