आल्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 1989 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 668 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच रत्नागिरी मार्केटमध्ये आवक झालेल्या 16 क्विंटल आल्यास 6400 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
द्राक्षाची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 407 क्विंटल द्राक्षाची आवक राहिली. यापैकी नागपूर बाजारात आवक झालेल्या 143 क्विंटल द्राक्षास 4000 ते 6000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 19 क्विंटल द्राक्षास प्रतीनुसार 10000 ते 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंब दराची लाली वाढली
आज राज्याच्या मार्केटमध्ये 1556 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर बाजारात 1205 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 93 क्विंटल भगवा डाळिंबास 13000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वसाधारण बाजारभाव मिळाला. डाळिंब बाजारातील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील आठवड्यापर्यंत दीडशे रुपये किलो दरम्यान मिळत असलेले डाळिंब सध्या 180 ते 250 रुपये किलो पर्यंत वाढले आहे. डाळिंबाची निर्यात वाढल्याने स्थानिक बाजारातील आवक कमी होऊन डाळिंबाचे भाव वाढले आहेत.





