आसाममधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अर्चिता फुकन, जी ‘बेबीडॉल आर्ची’ या नावाने ओळखली जाते, हिच्याबाबत सोशल मीडियावर खोट्या आणि अश्लील गोष्टी व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ झाला. काही दिवसांपूर्वी अर्चिताचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. यामध्ये असा दावा करण्यात आला की ती परदेशी पोर्न इंडस्ट्रीशी संबंधित आहे. या आरोपांमुळे तिची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली होती.
advertisement
कोण आहे बेबी डॉल आर्ची? भारतापासून अमेरिकेपर्यंत चर्चा, प्रसिद्ध अडल्ट स्टारसोबतचा फोटो व्हायरल
पण आता पोलिस तपासात एक मोठा खुलासा झाला आहे. अर्चिताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आणि हा सारा कट तिच्या EX प्रियकर प्रतिमा बोरा याने रचल्याचे उघड झाले. पोलिसांनी प्रतिमाला अटक केली असून, त्याने AI तंत्रज्ञानाचा वापर करून अर्चिताचे खोटे अश्लील फोटो तयार केल्याची कबुली दिली आहे.
अर्चिता आणि प्रतिमा यांच्यात काही काळ प्रेमसंबंध होते. मात्र ब्रेकअपनंतर वैयक्तिक द्वेषातून त्याने तिला बदनाम करण्यासाठी फोटो मॉर्फिंग करून सोशल मीडियावर पोस्ट केले. एवढंच नाही, तर त्याने बनावट अकाऊंट्स वापरून अर्चितावर खोटे आरोप करत व्हिडिओ व्हायरल केले. आसाम पोलिसांनीही स्पष्टपणे सांगितले की अर्चिता फुकनचा कोणत्याही प्रकारच्या पोर्नोग्राफिक कंटेंटशी काहीही संबंध नाही. तिला खोट्या पद्धतीने बदनाम करण्यात आलं आहे. हा प्रकार केवळ AI चा दुरुपयोग असून, त्यामागे वैयक्तिक सूडाची भावना होती.
दरम्यान, अर्चिताने पोलिसांची मदत घेतल्याने सत्य बाहेर आलं आणि आरोपीला अटक झाली. सोशल मीडियावर तिच्या समर्थनातही आता लोक आवाज उठवत आहेत.
