ही व्यक्ती दुसरी कोणी नसून बिग बॉस फेम आणि साताऱ्याचे सुपुत्र अभिजीत बिचुकले आहेत. बिचुकले यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या शक्यता आता धुसर झाल्या आहेत.
सुनेत्रा पवारांविरोधात अभिजीत बिचुकले
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून प्रशासकीय पातळीवर अर्जांची छाननी सुरू आहे. अशातच अभिजीत बिचुकले यांच्या अर्जाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. बिचुकले यांचा याआधीचा इतिहास पाहता, ते एकदा निवडणुकीच्या मैदानात उतरले की ते मागे हटत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक होणारच यात काही शंका नाही.
advertisement
अभिजीत बिचुकले यांनी अशाप्रकारे निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी लोकसभा, विधानसभा इतकंच नाही तर सातारच्या नगरपालिकेचीही निवडणूक लढवली आहे. त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले आणि वरळीतून आदित्य ठाकरे यांच्या विरोधातही दंड थोपटले होते. या निवडणुकांमध्ये त्यांना यश आले नसलं, तरीही त्यांचा आत्मविश्वास कमी झालेला नाही.
पत्रकार परिषद घेऊन सांगणार पुढचा प्लॅन
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बिचुकले यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. "मी उमेदवारी का भरली? माझे मुद्दे काय आहेत? आणि बारामतीसाठी माझा 'प्लॅन' काय आहे?" हे स्पष्ट करण्यासाठी ते पुढील दोन दिवसांत एक पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते नक्की कोणावर निशाणा साधतात आणि काय 'ट्वीस्ट' निर्माण करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
