TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : दिव्यानंतर या सदस्याचा नंबर, 'बिग बॉस'नंतर भाऊचाही मोठा धक्का?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात वादग्रस्त स्पर्धकाला रितेश देशमुख झापताना दिसतो आहे. त्यामुळे घरातील हाच सदस्य आता घरातून बाहेर पडेल असं म्हटलं जातं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 च्या घरात बिग बॉसने शुक्रवारी मोठा धक्का दिला. ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती तो स्पर्धक म्हणजे दिव्या शिंदेला बिग बॉसने घराबाहेरचा रस्ता दाखवला. घरातील सदस्यांसह चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. ना कोणती हाणामारी, ना मोठा राडा फक्त एका धमकीने दिव्याचं बिग बॉसच्या घरातील स्वप्न चौथ्या आठवड्यातच धुळीला मिळालं. मग आता सतत वादात असलेल्या स्पर्धकाचं काही खरं नाही, असंच म्हटलं जात आहे. पुढच्या नंबर त्याच स्पर्धकाचा असेल असा अंदाच वर्तवला जातो आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉसच्या घरात आठवड्याच्या शेवटी म्हणजे भाऊच्या धक्क्यावर एव्हिक्शन होतं. ज्यात सहसा स्पर्धक मतदानाने किंवा कमी मतांमुळे घराबाहेर पडतात, पण दिव्या शिंदे हिला मात्र भाऊच्या धक्क्याआधीच बिग बॉसनेच तिला तिच्या एका खळबळजनक विधानामुळे घराबाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिवाय आठवड्यात एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर पडणार असं बिग बॉसने जाहीर केलं होतं. यात सतत नियम धाब्यावर बसवलेल्यांचा समावेश असेल. त्यानंतर आता भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे, ज्यात वादग्रस्त स्पर्धकाला रितेश देशमुख झापताना दिसतो आहे. त्यामुळे घरातील हाच सदस्य आता घरातून बाहेर पडेल असं म्हटलं जातं आहे.

advertisement

हा सदस्य दुसरा तिसरा कुणी नाही तर रुचिता जामदार आहे. जी बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून पहिल्याच दिवसापासून सतत वाद घालते, भांडणं, राडा करते.

भाऊच्या धक्क्याच्या प्रोमोत रितेश देशमुख बोलतो, रुचिता या घरातील सगळ्यात मोठा व्हिलन तुम्ही ठरलात. सतत उद्धट वागायचं. टास्क रद्द कसा होईल हेच बघायचं. एकही दिवस तुम्ही असा सोडला नाही जिथं तुम्ही मर्यादा ओलांडली नाही. ती कुऱ्हाड घ्या. असं म्हणताच अनुश्री रुचिताच्या हातात कुऱ्हाड घेऊन उभी दिसते. तिच्या चेहऱ्यावर टेन्शनही आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर तेजीत, तुर आणि कापसाला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

त्यामुळे आता बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडणारी दुसरी सदस्य रुचिता असणार? हे येणाऱ्या एपिसोडमध्येच दिसेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : दिव्यानंतर या सदस्याचा नंबर, 'बिग बॉस'नंतर भाऊचाही मोठा धक्का?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल