'भाऊच्या धक्क्यावर' रोमँटिक डान्स
आजचा 'भाऊचा धक्का' खऱ्या अर्थाने गाजला तो विशाल आणि रुचिताच्या केमिस्ट्रीमुळे. पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली रुचिता आणि पांढऱ्या सूटमध्ये डॅशिंग दिसणारा विशाल यांनी 'का जीव तोळा तोळा' या गाण्यावर असा काही परफॉर्मन्स दिला की घरचे सदस्य अवाक झाले. त्यांच्यातील ही जवळीक पाहून खुद्द रितेशनेही आश्चर्याने तोंडात बोटं घातली. विशालने आधीच स्पष्ट केलंय की, "आमच्यात वयाचं अंतर असलं तरी मला फरक पडत नाही, आम्ही ते बघून घेऊ."
advertisement
पण सध्या गोड प्रेमकथेत कडू चव येतेय ती राखी सावंतमुळे. कालच्या एपिसोडमध्ये रितेशने जेव्हा राखीला तिच्या अनुभवावरून खेळाबद्दल विचारलं, तेव्हा रुचिता मध्येच म्हणाली की, "मुद्दे मिळत नसल्यामुळे राखी काहीही खोटं नाटक क्रिएट करतेय." यावर राखीने डिवचत म्हटलं, "अरे तुम्ही जे तिथे बसून 'लव्ह लपाटा' करता, त्याचं काय?
हे ऐकताच रुचिताची सटकली! तिने राखीला झापत म्हटलं, "राखी, तुला शेवटचं सांगतेय, माझ्या पर्सनल आयुष्यात लक्ष देऊ नकोस. तू राखी सावंत आहेस ना? मग तशीच राहा. माझ्या मागे मागे शेपटीसारखं हिंडणं बंद कर. तुला नवीन लोक आणि नवीन मुद्दे मिळत नसतील, तर शोध, पण माझं नाव घेऊ नकोस!"
रुचिताला राखीचं सडेतोड उत्तर
नेहमीप्रमाणे राखीनेही शांत राहिली नाही. सुरुवातीला रुचिताचं बोलणं ऐकून घेतल्यावर ती उपरोधिकपणे म्हणाली, "काय झालं? शॉक लागला का? की उंदीर चावला?" रुचिताने तिला लिमिटमध्ये राहण्याचा सल्ला दिल्यावर राखी कडाडली, "हे काही पर्सनल नाहीये. मी या घरात राहते, माझे डोळे जे बघतात आणि जे बघणार, ते मी बोलणारच! या घरात जे काही होणार, त्यावर मी माझं मत मांडणार."
