TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : आधी घटस्फोट, नंतर ब्रेकअप; आता वॅलेंटाइन डेनंतर राकेश बापटला मिळाली मोठी 'जखम'

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 : वॅलेंटाइन डेनंतर बिग बॉस मराठी 6 च्या घरात गुलाब आणि काट्यांचा गेम रंगला. ज्यात आधीच घटस्फोट आणि ब्रेकअपची जखम मिळालेल्या राकेश बापटला मोठी 'जखम' मिळाली. ही जखम त्याला कुणी दिली?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील सदस्य आणि अभिनेता राकेश बापट ज्याचा आधी घटस्फोट झाला आहे, त्यानंतर त्याचं ब्रेकअपही झालं आहे त्याला आता बिग बॉसच्या घरातही मोठी जखम मिळाली आहे. वॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, याच्या दुसऱ्याच दिवशी राकेश बापट 'जखमेने घायाळ' झाला आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठी 6 मध्ये भाऊच्या धक्क्याचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील सदस्य वॅलेंटाइन डेच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांना गुलाब आणि काटे देताना दिसत आहेत. आवडत्या सदस्याला गुलाब आणि नावडत्या सदस्याला काटे असा हा गेम. यात काही जणांना गुलाब तर काही जणांना काटे मिळाले आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता अनुश्री माने राकेश बापटला काटे देते. ते घेताना राकेश बापटला काटे बोचतात, त्याला जखम होते आणि वेदनेने तो ओरडताना दिसतो.

advertisement

बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यापासून राकेश आणि अनुश्री यांच्यात वाद सुरू आहेत. दुसऱ्या आठवड्यात अनुश्री आक्रमकपणे राकेशला म्हणाली, "मला कोणीही माझ्या बेडवरून हलवू शकत नाही." तिने पुढे राकेशला उद्देशून म्हटले, "जिथे तू हात धरून मला उठवलंस ना, तिथेच माझ्या डोक्यात गेलास तू."

advertisement

अनुश्रीचं हे बोलणं ऐकून राकेशचा संयम सुटला. तो संतापून म्हणाला, "हे बोलणं चुकीचं आहे. Do not dare to say that again. आयुष्यात मी २५ वर्षं एवढं काम केलं आहे, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल?" या वादाने इतकं गंभीर वळण घेतलं की राकेश चिडून ओरडला, "मला या घरात आता थांबायचं नाहीये!" आणि तो तिथून निघून गेला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शनिपीडा, राहू-केतू दोष, शांतीसाठी शिवआराधना का मानली जाते प्रभावी? Video
सर्व पहा

त्यानंतर पुन्हा त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा "घरात एकही काम न करणाऱ्या मुलीचे आपण का ऐकून घ्यायचे?" असा प्रश्न राकेशने उपस्थित केला. दुसरीकडे अनुश्रीनेही राकेशला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. राकेश वारंवार तिला गप्प राहण्यास सांगत असताना अनुश्रीनेही त्याला तितक्याच प्रखरपणे उत्तर दिलं. दोघांमध्ये एकमेकांवर ओरडण्याची आणि 'चूप' राहण्याची स्पर्धाच लागली होती.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : आधी घटस्फोट, नंतर ब्रेकअप; आता वॅलेंटाइन डेनंतर राकेश बापटला मिळाली मोठी 'जखम'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल