चौथ्या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी नॉमिनेशन झालं. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी कॅप्टनीसाठीचा टास्क आहे. कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठी पापडाचा टास्क देण्यात आला आहे. या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात या पापड टास्कमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतं आहे.
Bigg Boss Marathi 6 : खरा 'डॉन' निघाला! प्रभू शेळकेने 'बिग बॉस'च्या घरात अखेर आपला रिअल अवतार दाखवला
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एकमेकांचं पीठ, पापड पळवले जात आहेत, एकमेकांच्या अंगावर पीठ ओतलं जात आहे. कुणी कुणाला पकडून ठेवलं आहे, तर कुणी कुणाला मारलंही आहे. रुचिता जामदार जिच्यावर करण सोनावणेने पीठ ओतलं त्यानंतर रुचिताने त्याला झापड लगावली आणि करण चवताळल्याचं दिसतं आहे. रुचिताना हात उगारताच करणचा पारा चढला आणि तोही तिला मारायला गेल्याचं दिसतं. ए मारतेस काय, देऊ काय? असं तो तिच्यावर मोठ्याने ओरजतो. त्याने हात उचल्याचंही दिसतं.
Ronali Raut : 'आऊट' नाही झाली, Bigg Boss Marathi 6 मधून स्वत:च बाहेर पडली सोनाली राऊत, कारण शॉकिंग
बिग बॉसच्या घरातील इतर सदस्य तिथं येतात आणि त्या दोघांना रोखतात. विशाल करणला रोखून शांत करताना दिसतो आहे. आता बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सी उमेदवारीचे पापड लाटले जाणार की त्यांचा चक्काचूक होणार? पुढे नेमकं काय घडणार? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.
दरम्यान हा प्रोमो सोशल मीडियावर येताच प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. बहुतेकांनी रुचिताला टार्गेट केलं आहे. ती भंगार आहे तिला घराबाहेर काढा, पुढचा नंबर तिचाच लावा अशा कमेंट अनेक युझर्सनी केलं आहे. आर्यानी निक्कीला मारलं होतं तर तुम्ही तिला बाहेर काढलं होतं, आता हिलापण काढा बाहेर असं एका युझरने म्हटलं आहे. काहींनी करणलाही ट्रोल केलं. 'तू त्याच लायकीच सोनावणे बाई बाई चाळे सगळे मग खाणार ना मार', अशी कमेंट एका युझरने केली आहे. तर काहींनी रुचिता सगळे भंगार समजता पण खरा गेम तर ती खेळते, असं म्हणत पाठिंबा दिला आहे.
