TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : खरा 'डॉन' निघाला! प्रभू शेळकेने 'बिग बॉस'च्या घरात अखेर आपला रिअल अवतार दाखवला

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Prabhu Shelke : बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा म्हणजे 24 व्या दिवसाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात प्रभू शेळके भडकलेला दिसतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू आहे. चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन झालं, यानंतर आता घरातील वातावरण आणि समीकरणं बदललेली दिसत आहेत. आतापर्यंत छोटा आणि निरागस वाटणारा प्रभू शेळके जो छोटा डॉन म्हणून ओळखला जातो. त्याने अखेर आपला खरा डॉन अवतार दाखवला आहे. बिग बॉसच्या घरातील एका सदस्याला प्रभू चांगलाच भिडला आहे, त्याने त्याला थेट धमकी दिली आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा म्हणजे 24 व्या दिवसाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात प्रभू शेळके भडकलेला दिसतो आहे. प्रभू शेळके विशाल कोटियनला भिडला आहे. विशाल आणि प्रभू यांच्या जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

Bigg Boss Marathi 6 : घरातील सदस्यांच्या भांडणात आता 'बिग बॉस'च वादात; थेट नाव बदलण्याची मागणी, पण का?

advertisement

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता जोडीच्या बेडीत अडकलेले सागर आणि प्रभू दोघं एकत्र आहेत. त्यावेळी विशाल आणि ओमकार समोर सोफ्यावर बसले आहेत. विशाल प्रभूला डिवचताना दिसतो. तो प्रभूला म्हणतो, "तू माझ्यासाठी फार महत्त्वाचा नाहीस. तू नॉमिनेटेड आहेस मला तुझ्याकडून फुटेज नको"

यावर प्रभू भडकतो. त्याच्यातील खरा डॉन जागा होतो. तो आपला डॉन अवतार दाखवतो. डोळे वगैरे मोठे करून तो विशालला थेट धमकी देतो. तो म्हणतो, "डॉन म्हणत्यात मला. हलक्यात घ्यायचं नाही. दुसऱ्याची वाट लावूनच मी बाहेर जाणार"

advertisement

विशाल आणि प्रभू यांच्यात 23 व्या दिवशी म्हणजे काल झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्येही भांडण झालं होतं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 व्या दिवशी दोघं पुन्हा भिडले, त्यामुळे त्यांच्या भांडणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  एकूणच प्रभू आणि विशालच्या भांडणामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलेलं दिसतं आहे.

आतापर्यंत प्रभू म्हणजे छोटा, निरागस असाच वाटायचा. नॉमिशेनवेळीही सदस्यांनी प्रभू जसा दाखवतो तसा नाही, असं म्हटलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी छोटा डॉनने आपला डॉन अवतार सगळ्यांना दाखवून दिला आहे. त्यामुळे आता शोमध्ये खरी मजा येणार आहे.

advertisement

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरात 'डर्टिनेस'! बाहेर पडताच सोनाली राऊतने उलगडलं मोठं सीक्रेट

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

या आठवड्यात प्रभू शेळके, ओमकार राऊत, आयुष संजीव, सचिन कुमावत, दिपाली सय्यद, अनुश्री माने, दिव्या शिंदे, रोशन भजनकर, राकेश बापट असे एकूण 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : खरा 'डॉन' निघाला! प्रभू शेळकेने 'बिग बॉस'च्या घरात अखेर आपला रिअल अवतार दाखवला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल