‘बिग बॉस'ने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वी जाहीर केला. यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. दिव्याला घराबाहेर काढण्याआधी 'बिग बॉस'ने अनेकदा तिला समजवण्याचा प्रयत्न केला होता. कन्फेशन रूममध्ये राकेश बापटने सुद्धा भावाच्या नात्याने दिव्याला काही गोष्टी सांगितल्या होत्या. पण दिव्या तिच्या मतावर शेवटपर्यंत ठाम होती. तसंच मी कोणाचीही माफी मागणार नाही हे तिने ठामपणे सांगितलं होतं.
advertisement
याबाबत सोशल मीडियावर घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. घरात तर दिव्या आपल्या वक्तव्यावर ठाम राहिली, माफी मागायला नकार दिला. पण आता घराबाहेर आल्यावर दिव्या नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. बिग बॉसमधून एक्झिट घेतल्यानंतर दिव्याच्या टीमकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये तिच्या चाहत्यांचे आभार मानत एक विनंती केली आहे.
पोस्टमध्ये म्हटलं आहे, "आम्ही समजू शकतो की, 'बिग बॉस मराठी' शोमधून दिव्या शिंदेची एक्झिट झाल्यामुळे अनेक लोक भावुक झालेत तर काहींना धक्का बसला आहे. पण तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी सर्वकाही आहे. आम्ही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण सर्वांना एक विनंती करतो, कृपया कोणीही या घटनेबाबत चुकीची माहिती किंवा नकारात्मकता पसरवू नका. आम्हाला तुम्हाला खूप काही सांगायचं आहे. आम्ही लवकरच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ आणि आमची बाजूही मांडू"
थँक्यू! टीम दिव्या शिंदे, असं या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. दरम्यान आता दिव्या शिंदे या प्रकरणावर कधी भाष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
