बिग बॉस आणि राखी सावंत म्हणजे प्रेक्षकांसाठी एक समीकरण झालं आहे. बिग बॉस हिंदीसह बिग बॉस मराठीतही गेल्या अनेक सीझन्सपासून राखी सावंतला चाहते पाहत आहेत. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये राखी सावंत वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती. शिवाय, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये एक ते दोन दिवसांसाठी राखी सावंत आली होती. आता देखील राखी 15 दिवसांसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या बातमीची जोरदार चर्चा होत आहे.
advertisement
याबाबत राजश्री मराठीशी बोलताना राखीने सांगितलं की, मला याबाबत बोलायला परवानगी नाही. पण जर मी बिग बॉस मराठीच्या घरात आली आली तर राडा घालणार, धिंगाणा घालणार, सगळ्यांना मिरची लावणार. असं सांगते. शूSSS आवाज खाली, 20 पावलं मागे, असंही ती म्हणते.
आपल्या मिश्किल स्वभावासाठी ओळखली जाणारी राखी प्रेक्षकांसह स्पर्धकांचेही खळखळून मनोरंजन करते. तिच्या वक्तव्यांची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.
