TRENDING:

Bigg Boss Marathi 6 Wild Card: बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री, 'जाऊ बाई गावात' फेम अभिनेत्री येणार; कोण आहे 'ही' स्पर्धक

Last Updated:

राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओंकार राऊत, आयुष संजीव, करण सोनावणे, सचिन कुमावत आणि रोशन भजनकर हे स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर आता घरामध्ये आणखी एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची सध्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंतची वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री झाली होती. आता तिच्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये आणखी एका स्पर्धकांची एन्ट्री होणार आहे. राधा पाटील, सोनाली राऊत, दिव्या शिंदे, ओंकार राऊत, आयुष संजीव, करण सोनावणे, सचिन कुमावत आणि रोशन भजनकर हे स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर गेल्यानंतर आता घरामध्ये आणखी एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे.
bigg boss marathi 6 wild card contestant who is jau bai gaavat actress sanskruti salunkhe bb marathi 6 contestant
bigg boss marathi 6 wild card contestant who is jau bai gaavat actress sanskruti salunkhe bb marathi 6 contestant
advertisement

त्यापैकी एक स्पर्धक म्हणजे, संस्कृती साळुंखे... संस्कृती बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेणार आहे. संस्कृती साळुंखे विषयी सांगायचे तर, ती यापूर्वी सुद्धा काही रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हार्दिक जोशीच्या 'जाऊ बाई गावात' या शोच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. सोशल मीडियावर 'पापा की परी' म्हणून फेमस झालेल्या संस्कृतीचा इन्स्टाग्रामवर फार मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडिया एन्फ्लूएंसर म्हणून चर्चेत राहिलेली संस्कृती सध्या बिग बॉस मराठीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या ती बिग बॉसमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तुम्ही कधी खाल्लीये का मासे चकली? दुर्गा यांचा व्यवसाय हिट,महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात सर्वच स्पर्धक आपआपल्या पद्धतीने खेळ खेळून स्वत:ला सेफ करण्याचा प्रयत्न करत आहे. वाईल्ड कार्डसह इतरत्र स्पर्धक आपआपल्या विशेष खेळीने आपल्या प्रति स्पर्धकाला कशा पद्धतीने वादात टाकायचा अशी खेळी खेळताना दिसत आहे. एकदा की, बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली की, एकंदरीतच घरातल्या सर्वच स्पर्धकाचा खेळ बदलत असतो. आता बिग बॉसच्या घरामध्ये एकत्रित तीन तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाल्यानंतर घरातलं वातावरण कशापद्धतीने बदलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता घरातले सर्व स्पर्धक आपली खेळी कशापद्धतीने बदलणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 Wild Card: बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री, 'जाऊ बाई गावात' फेम अभिनेत्री येणार; कोण आहे 'ही' स्पर्धक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल