अभिजीत सावंतला खरी ओळख मिळाली ती इंडियन आयडल या कार्यक्रमामुळे. देशातल्या पहिल्या सिंगिंग रिॲलिटी शोचा तो विजेता ठरला होता. त्याला संपूर्ण देशातून खूप प्रेम मिळाले. यानंतर त्याने अनेक अल्बमसाठी गाणी गायली. मात्र, काळाच्या ओघात हा गायक लुप्त झाला. बिग बॉस मराठीमुळे तो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आणि त्याने पुन्हा एकदा तीच कमाल करून दाखवली.
advertisement
अभिजीतच्या बिग बॉसमधील खेळाचे प्रेक्षकांकडूनच नाही तर कार्यक्रमाचे होस्ट रितेश देशमुखकडूनही खूप कौतुक झाले. घरातील स्पर्धकांकडून त्याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. मात्र, त्यांच्याकडे लक्ष न देता अभिजीत त्याचा खेळ खेळत राहिला आणि त्याने खेळाच्या उपविजेते पदापर्यंत मजल मारली.
'क्राइम पेट्रोल'मधील ॲक्टर्स मेकअप का करत नाहीत? डायरेक्टरने सांगितलं कारण, 'सेटवरील गर्दीला...'
बिग बॉस मराठीनंतर अभिजीत आता सोनी हिंदी वाहिनीवरील सेलिब्रिटी मास्टरशेफ या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. या कार्यक्रमात त्याच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, तेजस्वी प्रकाश यांच्यासह अनेक हिंदी सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. २७ जानेवारीपासून या कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले आहे. दरम्यान, शोच्या प्रमोशनसाठी स्पर्धकांनी सोनी वाहिनीवरील इंडियन आयडल या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अभिजीत सावंतही होता.
अभिजीत सावंत हा इंडियन आयडलचा पहिला विजेता आहे. अशा परिस्थितीत त्याची उपस्थिती खूपच खास होती. त्याने आपले जुने दिवस आठवले आणि त्याच्या सुंदर आठवणींना उजाळा दिला. त्याला पुन्हा एकदा इंडियन आयडलच्या मंचावर गाताना पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच खूप आनंद झाला आहे.