टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे चाहत खन्ना. चाहत खन्नाने आपल्या आयुष्यात दोनदा संसार मोडण्याचं दुःख भोगलं आहे. दोनदा लग्न मोडल्यानंतर चाहत खन्ना आता तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान अभिनेता रोहन गंडोत्राला डेट करत आहे. तसंच दोघंही लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय.
'ही विकृती, फालतूपणा...' पारू मधील तो सीन पाहून भडकले प्रेक्षक; मालिका बंद करण्याची होतेय मागणी
advertisement
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चाहत आणि रोहन यांनी आपलं नातं लपवून ठेवलं आहे. अभिनेत्रीच्या दोन्ही मुलींबरोबर रोहनचं चांगलं बॉन्डिंग आहे, असं म्हटलं जातं. सध्या दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. तसेच चाहत रोहनबरोबरचं नातं पुढे नेण्यास तयार असल्याचीही चर्चा आहे. दोघांच्या लग्नाच्या बातम्यांना उधाण आलं आहे, पण ते खरंच लग्न करणार का, हे जाणून घेण्यासाठी चाहत व रोहनच्या प्रतिक्रियेची वाट पाहावी लागणार आहे.
सध्या चाहत आणि रोहन गंडोत्रा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. तसंच दोघंही आता नातं पुढे नेण्यासाठी तयार आहेत. अशा परिस्थितीत दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकरणी चाहतनं काहीही खुलासा केलेला नाही. तसेच तिचा बॉयफ्रेंड रोहन गंडोत्रानंही कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
चाहत खन्ना ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. चाहत खन्नाचं पहिलं लग्न 2006 मध्ये भरत नरसिंघानीसोबत झालं होतं. त्यावेळी अभिनेत्री फक्त 20 वर्षांची होती. मात्र, चाहत आणि भरतचं लग्न टिकलं नाही. 2007 मध्येच दोघांचा घटस्फोट झाला.
पहिलं लग्न मोडल्यानंतर चाहतने 2013 मध्ये फरहान मिर्झासोबत दुसरं लग्न केलं. मात्र, चाहत आणि फरहानचं नातंही फार काळ टिकलं नाही. पण या नात्यात देखील चाहतने खूप दुःख सहन केलं. लग्नानंतर फरहान आणि चाहत यांना दोन मुली झाल्या. मात्र, 2018 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाची अनेक कारणं होती. अभिनेत्रीनं फरहान तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा असा खुलासा केला. एवढंच नाही तर फरहानला चाहतचं तिच्या सहकलाकाराशी अफेअर असल्याचा संशय होता.
2018 मध्ये अभिनेत्रीने स्वतः फरहानपासून घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली होती की, हे माझं दुसरं लग्न होतं, समाजाचा माझ्यावर दबाव होता त्यामुळं मी हे लग्न टिकवण्याचा प्रयत्न केला. पण असह्य झाल्यानंतर मी त्यातून बाहेर पडले. तो माझ्यावर संशय घ्यायचा, तो माझा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा.' असा खुलासा तिने दुसऱ्या लग्नाबद्दल केला होता.
तसंच चाहतने 'फरहान जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवायचा. माझ्या जीवाला धोका असला तरी त्याला काही फरक पडला नाही. हे सगळं मला माझ्या मुलींसाठी सहन करावं लागलं.' असंही ती म्हणाली होती. त्यानंतर चाहतने त्याला घटस्फोट दिला. आता ती तिसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे.
