advertisement

'ही विकृती, फालतूपणा...' पारू मधील तो सीन पाहून भडकले प्रेक्षक; मालिका बंद करण्याची होतेय मागणी

Last Updated:

एक मालिका त्याच्या नव्या प्रोमोमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत दाखवण्यात आलेल्या दृश्यावर प्रेक्षक संताप व्यक्त करतायत.

पारू
पारू
मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरच्या मालिका खूपच चर्चेत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत राहण्यासाठी मालिकेचे निर्माते कंबर कसून काम करतायत. अनेक मालिकांमध्ये कथानकात बदल होत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यातील काही मालिकांच्या कथानकाचा परिणाम टीआरपीवर चांगला होताना दिसतोय, तर काहींचा उलट परिणाम देखील होतोय. अशातच एक मालिका त्याच्या नव्या प्रोमोमुळे चर्चेत आली आहे. या मालिकेत दाखवण्यात आलेल्या दृश्यावर प्रेक्षक संताप व्यक्त करतायत.
झी मराठीची लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे 'पारू'. या मालिकेला प्रेक्षकांचा अल्पावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पारू आणि आदित्यची जोडी हिट झाली. तर अहिल्यादेवी किर्लोस्करच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पण आता ही मालिका प्रेक्षकांच्या निशाण्यावर आली आहे. या मालिकेवर प्रेक्षक संताप व्यक्त करतायत. एवढंच नाही तर मालिका बंद करण्याचीही मागणी होतेय.
advertisement
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्यानं करिअर उद्ध्वस्त, कोणी देत नाहीये काम; सबा अझादनं सांगितली व्यथा
नुकताच ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो ‘झी मराठी’ने शेअर केला आहे. ज्यात दाखवलेल्या एका सीनवर प्रेक्षक भडकले आहेत. या मालिकेत एक नवं वळण येणार असं दाखवण्यात आलं आहे. प्रोमोच्या सुरुवातीलाच दामिनी अहिल्यादेवीच्या अवतारात पाहायला मिळत असून ती पारूचा भाऊ गणीला काठीने बेदम मारहाण करताना दिसत आहे. 'आदित्य कुठे आहे?', 'पारूने आदित्यला किडनॅप केलं का?' असं विचारत दामिनी छोट्या मुलाला मारहाण करत आहेत. तर त्याचवेळी दिशा हसत आहे. हाच सीन पाहून प्रेक्षक भडकले आहेत.
advertisement
advertisement
या प्रोमोवर प्रेक्षकांनी या प्रोमोवर 'विकृत दाखवत आहे एका लहान मुलावर अत्याचार.... हें फार चुकीचं आहे.', 'Child abuse दाखवू नका रे फालतू लोकानो', 'काय बाई आहे एवढे मारते मुलाला.. संस्कार आहे का थोडे', 'हीला काही अक्कल आहे का नाही मुर्खाचा बाजार आहे. ही दामीनी व दिशा बिनडोक डायरेक्टरला मेन अक्कल नाही', 'विकृती दाखवत आहेत. काय दाखवायचं काय नाही कळत नाही का? मनोरंजन साठी सिरीयल असतात पण ताळ मेळ सोडून काहीही दाखवत आहे.', 'हे देवा काय चाललंय हे प्रत्येक सिरियल मध्ये काय काय दाखवता हे. सिरियल नावाच मूळच उपटून टाका एकदाच', 'लेखक डोकयावर पडलाय काय एवढ्या लहान मुलाला मारत आहेत. त्या देवी आई ला मारा, बस करा हा फालतू पणा', 'हे असं काही दाखवायचं असेल तर मालिका बंद करा. ' अशा कमेंट करत मालिका बंद करण्याची मागणी केली आहे. यावर मालिकेच्या निर्मात्यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता प्रेक्षकांच्या भावनांचा मान ठेवून हा सीन काढून टाकण्यात येणार का ते पाहणं महत्वाचं आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ही विकृती, फालतूपणा...' पारू मधील तो सीन पाहून भडकले प्रेक्षक; मालिका बंद करण्याची होतेय मागणी
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement