advertisement

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड असल्यानं करिअर उद्ध्वस्त, कोणी देत नाहीये काम; सबा अझादनं सांगितली व्यथा

Last Updated:
बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं म्हणजे हृतिक रोशन आणि सबा आझाद. या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा नेहमीच रंगतात. दोघे अनेकदा रोमँटिक डेट आणि व्हॅकेशनसाठी एकत्र वेळ घालवताना दिसतात. हृतिक आणि सबा अनेकदा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता सबा आझादने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. हृतिकची गर्लफ्रेंड असल्यानं तिला कोणी काम देत नाहीये अशी खंत तिने व्यक्त केली आहे.
1/8
बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं म्हणजे हृतिक रोशन आणि सबा आझाद.  या दोघांच्या प्रेमाच्या चर्चा नेहमीच रंगतात. दोघे अनेकदा रोमँटिक डेट आणि व्हॅकेशनसाठी एकत्र वेळ घालवताना दिसतात.

2/8
 हृतिक आणि सबाची भेट एका सोशल मीडिया साईटवर झाली होती. सबा देखील अभिनेत्याप्रमाणे कलाक्षेत्रात कार्यरत असून ती एक गायिका आणि अभिनेत्री आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.

3/8
गायिका आणि अभिनेत्री असण्यासोबतच सबा एक व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. जाहिरातींना आवाज देण्याचं काम ती करते. पण जेव्हापासून तिचं आणि हृतिकचं नातं सगळ्यांसमोर आलं तेव्हापासून तिला हे काम मिळत नसल्याची खंत सबाने व्यक्त केली आहे.

4/8
सबा अझादने स्टुडिओमधून रेकॉर्डिंग करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. तसंच २ वर्षानंतर तिच्या आवडीचं काम करत असल्याचं ती म्हणाली. ती म्हणाली, 'मी स्वतः हे काम बंद करतेय असं कोणालाच सांगितलं नाही. गेली कित्येक वर्ष मी हेच करतेय. पण गेल्या दोन वर्षात मला या कामाची एकही ऑफर आली नाही.'

5/8
''मी दिग्दर्शकाला याविषयी विचारलं तर तो म्हणाला, 'आम्हाला वाटलं तू आता हे काम करणार नसशील''

6/8
सबा आझादने तिच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, "आपण अजूनही त्याच अंधारात जगत आहोत, जिथे एखाद्या महिलेचा जोडीदार यशस्वी असेल, तर तिला काम करण्याची काही गरज नाही असं लोकांना वाटतं.''

7/8
ती पुढे म्हणाली, ''एका स्त्रीने यशस्वी पुरुषाच्या प्रेमात पडल्यावर स्वतःच्या कामाचा अभिमान बाळगू नये आणि स्वतःची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेऊ नये असं अनेकांना वाटतं.'' असं म्हणत सबाने खंत व्यक्त केली आहे.

8/8
 सबा आझाद एक गायिका आणि व्हॉईस ओव्हर कलाकार तसेच अभिनेत्री आहे. ती दिल कबड्डी, मुझसे दोस्ती करोगे, होम स्टोरीज यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय ती 2022 मध्ये रॉकेट बॉईज या वेब सीरिजमधून प्रसिद्धीच्या झोतात आली होती.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement