धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातमीनंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक बडे सेलिब्रिटी धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या जुहू येथील घरी पोहचत आहेत. धर्मेंद्र यांच्या पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल देखील घरी दाखल झाल्या आहेत. मात्र, यावेळी त्या अतिशय शोकाकूल अवस्थेत पाहायला मिळाल्या. हेमा मालिनी आणि ईशा यांचे व्हिडीओ सध्या समोर येत आहेत.
advertisement
आपल्या लाडक्या वडिलांना अखेरचा निरोप देण्यासाठी ईशा देओलही त्याच्या जुहू येथील घरी पोहोचली होती.
१९७० मध्ये 'तुम हसीं मैं जवान' या चित्रपटापासून धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली होती आणि १९८० मध्ये दोघांनी लग्न केले. धर्मेंद्र यांनी धर्म बदलून हे दुसरे लग्न केले होते, कारण ते पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊ इच्छित नव्हते. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम एकत्र काम केले. त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत असे. त्यांना ईशा आणि आहाना या दोन मुली आहेत.
धर्मेंद्र यांच्यावर विले पार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत आहेत. यावेळी सलमान खान, संजय दत्त, अमिताभ बच्चन, आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी धर्मेंद्र यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजेरी लावली आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनाने संपूर्ण देओल कुटुंबामध्ये एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केलेल्या धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा इक्कीस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धर्मेंद्र यांची शेवटची आठवण असलेला हा सिनेमा त्यांच्या चाहत्यांसाठी अतिशयखास ठरणार आहे.
