TRENDING:

काचेचे पॅनल, फिरता मार्बलचा जिना; पाकिस्तानात नाही, तर भारतातील 'या' गावात आहे हमजा-यालीनाचा आलिशान बंगला

Last Updated:

Dhurandhar 2 Collection: 'धुरंधर २' मध्ये हमजा त्याची पत्नी यालीनासाठी एक आलिशान व्हिला खरेदी करतो, असं दाखवण्यात आलं आहे. पण पाकिस्तानातील हा भव्य व्हिला खरं म्हणजे कराची नाही, तर भारतातील एका गावातील आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: सध्या बॉक्स ऑफिसवर एकच नाव गाजतंय ते म्हणजे 'धुरंधर २: द रिव्हेंज'. पहिल्याच वीकेंडमध्ये या फिल्मने कमाईचे नवे रेकॉर्ड्स तयार केले आहेत. रणवीर सिंगचा 'हमजा' अवतार आणि पडद्यावरील थरार पाहून प्रेक्षक वेडे झाले आहेत. 'धुरंधर २' मध्ये हमजा त्याची पत्नी यालीनासाठी एक आलिशान व्हिला खरेदी करतो, असं दाखवण्यात आलं आहे. हमजाने खरेदी केलेल्या या व्हिलाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. पण पाकिस्तानातील हा भव्य व्हिला खरं म्हणजे कराची नाही, तर भारतातील एका गावातील आहे.
News18
News18
advertisement

भारतातील या भागात बनलाय हमजाचा व्हिला

धुरंधरमध्ये दाखवण्यात आलेला हा व्हिला पंजाबमधील अमृतसर येथे आहे. 23DC Architects या नामांकित कंपनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर हे सीक्रेट रिव्हिल झालंय. 'धुरंधर'सारख्या एका भव्य फिल्ममध्ये आपला प्रोजेक्ट दाखवण्यात येणं, ही कोणत्याही कंपनीसाठी अतिशय मानाची गोष्ट आहे.

जे कोणालाच जमलं नाही, ते 'हमजा'ने करून दाखवलं! बॉक्स ऑफिसवर Dhurandhar 2 चा डंका

advertisement

फिल्म रिलीज झाल्यानंतर या कंपनीने याबाबत आनंद व्यक्त केला आहे. आर्किटेक्ट्सनी आनंद व्यक्त करताना लिहिलं की, "आदित्य धर यांच्या चित्रपटात आमचा 'आनंदा' प्रोजेक्ट पाहून खूप आनंद झाला. रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांच्या उपस्थितीने या घराला अधिकच जिवंतपणा आला आहे."

मॉडर्न पण तितकाच मिनिमल डेकॉर

फिल्ममध्ये दाखवण्यात आलेल्या या बंगल्याची रचना अतिशय क्लासी आणि आधुनिक आहे. होम डेकोरची आवड असलेल्यांसाठी ही उत्तम कलाकृती पाहणं ही एक पर्वणीच आहे. पडद्यावर दिसणाऱ्या या घराची काही खास वैशिष्ट्येही आहेत. या घराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे पारंपरिक विटांच्या भिंतींऐवजी मोठ्या काचेच्या पॅनेलचा आणि खिडक्यांचा वापर करण्यात आला आहे. यामुळे घराच्या कोनाकोपऱ्यात नैसर्गिक सूर्यप्रकाश खेळता राहतो. ऑफ-व्हाइट मार्बल फ्लोअरिंग आणि सूर्यप्रकाश यांचं कॉम्बिनेशन घराला एक शांत आणि रॉयल लूक देतं.

advertisement

Dhurandhar 2 मधील अभिनेत्याला लागली लॉटरी, मिळाली रिषभ शेट्टीची बिग बजेट फिल्म! आता साऊथमध्ये घालणार राडा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
3 हजारांपासून सुरूवात, 15 कोटींचा उभारला व्यवसाय, अमरावतीच्या शेतकऱ्याला ऑक्सफर्डचं आमंत्रण, Video
सर्व पहा

इतकंच नाही, तर घराच्या मध्यभागी असलेला काळ्या रंगाचा फिरता मार्बलचा जिना हे या वास्तूचं मुख्य आकर्षण आहे. हलक्या रंगाच्या भिंती आणि जमिनीच्या पार्श्वभूमीवर हा गडद रंगाचा जिना घराचं सौंदर्य आणखीनच खुलवतं. 'लेस इज मोर' हा नियम इथे तंतोतंत पाळला गेला आहे. घर आलिशान असूनही तिथे फर्निचरचा पसारा नाही. मखमली सोफे, साध्या पण मोहक पेंटिंग्स आणि सिलिंगला लटकणारा क्रिस्टलचा झुंबर यामुळे घराला मॉडर्न टच मिळतो. घराच्या आत लावलेली झाडं आणि काचेच्या भिंतींमधून दिसणारी बाहेरची हिरवळ यामुळे घराच्या आत बसूनही निसर्गाच्या कुशीत असल्याचा फील मिळतो.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
काचेचे पॅनल, फिरता मार्बलचा जिना; पाकिस्तानात नाही, तर भारतातील 'या' गावात आहे हमजा-यालीनाचा आलिशान बंगला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल