मराठी चित्रपटसृष्टीचे एव्हरग्रीन कपल सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांनी आपल्या लग्नाच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त या व्हायरल ट्रेंडवर असा काही डान्स केलाय की, त्यांच्यासमोर तरुणाईही फिकी पडेल.
अक्षय खन्नाची हुकस्टेप अन् महागुरूंचा स्वॅग!
'धुरंधर' चित्रपटात अक्षय खन्नाने खलनायक साकारला असला तरी त्याच्या एन्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलंय. 'Fa9la' गाण्यावर तो ज्या पद्धतीने थिरकलाय, ते पाहून प्रत्येकजण त्याचे डान्स मूव्ह्स कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय. सचिन पिळगांवकर हे मुळातच एक उत्तम डान्सर आहेत! त्यांनी या गाण्यावर सुप्रियाजींसोबत केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत त्यांची मुलगी श्रिया पिळगांवकर ही देखील डान्स करताना दिसत असून, तिघांची एनर्जी पाहण्यासारखी आहे.
advertisement
सुप्रिया-सचिन यांच्या लग्नाचा 40 वा वाढदिवस
सचिन आणि सुप्रिया यांच्या लग्नाला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास निमित्ताने श्रियाने आपल्या आई-बाबांचा हा खास व्हिडिओ शेअर करत एक अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. श्रिया म्हणते, "ह्यांची केमिस्ट्री! ४० वर्षांचं प्रेम, हास्य, प्रगती आणि एकमेकांची साथ. या सगळ्यात त्यांनी त्यांचा वेडेपणा कधीही कमी होऊ दिला नाही. पडद्यावर आणि पडद्यामागे तुम्ही नेहमीच आदर्श राहिला आहात."
Kareena Kapoor: 'तुझा ॲटीट्यूड बंद कर', सैफने करीना कपूरला दिली होती Warning, बेबोची उडालेली झोप
श्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओत सचिन आणि सुप्रिया यांच्यातील ट्युनिंग पाहून हे दोघे आजही एकमेकांच्या प्रेमात किती आकंठ बुडालेले आहेत, याचा प्रत्यय येतो. ४० वर्षांनंतरही त्यांचा उत्साह एखाद्या विशीतल्या जोडप्यासारखाच दिसतोय.
हा व्हिडिओ पोस्ट होताच अवघ्या काही तासांत तो व्हायरल झाला. सुमीत राघवन, स्वप्नील जोशी यांसारख्या कलाकारांनी कमेंट्स करत या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी तर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. "पिळगांवकर फॅमिली नेहमीच धुरंधर असते," अशी कमेंट एका युजरने केली आहे, तर दुसऱ्याने "सचिन सरांची एनर्जी पाहून थक्क झालो," असं म्हटलंय.
