TRENDING:

Divya Shinde: 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच दिव्या शिंदे कडाडली; सांगितला 'तलवारीच्या धमकी'चा खरा अर्थ

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Divya Shinde: नॅशनल टेलिव्हिजनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दिव्या शिंदेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यावर आता दिव्याने आपली बाजू मांडली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातून ज्या 'तलवार' प्रकरणाने दिव्या शिंदेची हकालपट्टी झाली, त्याच प्रकरणावर आता दिव्याने लढाई सुरू केली आहे. घराबाहेर पडल्यावर "विषय संपला नाही, आता तर सुरू झालाय" असा इशारा देणाऱ्या दिव्याने आज मुंबईत एक धडाकेबाज पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिव्याने केवळ स्पष्टीकरणच दिलं नाही, तर घरात तिच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचताना तिला अश्रूही अनावर झाले.
News18
News18
advertisement

दिव्याने उलगडला त्या धमकीमागचा अर्थ

नॅशनल टेलिव्हिजनवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दिव्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. यावर आपली बाजू मांडताना दिव्या म्हणाली, "लोकांनी माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला. जे लोक वैचारिक आहेत, त्यांच्यासाठी तलवार ही शाब्दिक असते, स्वाभिमानाची असते. या संविधानिक देशात कोणी खरंच तलवार घेऊन कोणाला मारायला जाणार आहे का? माझी तलवार ही माझ्या विचारांची आणि माझ्या माजाची आहे. मी बिग बॉसला १०० वेळा सांगितलं होतं की मला घराबाहेरचं बोलायला लावू नका, पण तिथे कोणीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं."

advertisement

The 50 मध्ये मोठा ट्विस्ट, जान्हवी किल्लेकरनंतर निक्की तांबोळीचाही पत्ता कट? कोणी दिला धोका?

"विषय संपला नाही, आता सुरू झालाय!"

घरातून बाहेर पडताच दिव्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिली होती. "जय भीम, जय शिवराय" म्हणत तिने महाराष्ट्र आणि जगभरातून तिला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पण त्याचसोबत, "आता विषय सुरू झालाय" असं म्हणत तिने बिग बॉसच्या मेकर्सना आणि तिला टार्गेट करणाऱ्या सदस्यांना सूचक इशारा दिला. दिव्याच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात बिग बॉसच्या आतल्या गोष्टी चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

advertisement

पत्रकार परिषदेत भावूक क्षण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'मुन्नी'ने दिला दगा, 5 लाखांचं झालं नुकसान, शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार
सर्व पहा

बिग बॉसच्या घरातील घडामोडींबद्दल बोलताना दिव्याच्या डोळ्यांत पाणी आलं. आपली बाजू मांडण्याची योग्य संधी न मिळाल्याची खंत तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरीही, तिने आपलं म्हणणं ठामपणे मांडलं. दिव्याच्या मते, तिला जाणीवपूर्वक अशा कोपऱ्यात ढकललं गेलं जिथे तिचा संताप अनावर व्हावा. या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा दिव्याच्या समर्थकांचा आणि विरोधकांचा मोठा राडा पाहायला मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Divya Shinde: 'बिग बॉस'मधून बाहेर पडताच दिव्या शिंदे कडाडली; सांगितला 'तलवारीच्या धमकी'चा खरा अर्थ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल