TRENDING:

आधी तोंडाने कपडे काढले, मग अंघोळ घातली अन्... एल्विश यादवच्या शोवर नको ते दाखवलं; प्रेक्षक संतापले, VIDEO

Last Updated:

Engaged 2 Dating Show : या शो दरम्यान एका टास्कमध्ये करण्यात आलेला टास्क सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी शोवर टीका केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सध्या रिअलिटी शोचं पिक आलं आहे. असाच एक शो सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ज्यात जोडीदार शोधायचा आहे. प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव आणि टीव्ही अभिनेत्री जिया शंकर हे या डेटिंग रिअॅलिटी शोचे होस्ट आहेत.  Engaged असं या शोचं नाव असून या शोचा दुसरा सीझन सुरू आहे. या शो दरम्यान एका टास्कमध्ये करण्यात आलेला टास्क सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षकांनी शोवर टीका केली आहे.
News18
News18
advertisement

एंगेजच्या लेटेस्ट 'लव्ह चॅलेंज'ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या टास्कमध्ये एका पुरूष स्पर्धकांना चिखलाने माखलेल्या त्यांच्या महिला पार्टनरपर्यंत पोहोचायचे होते. मुलींना साखळ्या आणि हँडकफच्या सहाय्याने बांधण्यात आले होतं. तर मुलांना विविध अडथळे पार करत त्यांच्या पार्टनरकडे जायचं होतं. जो स्पर्धक आधी पोहोचेल त्याला कॅमेऱ्यासमोरच आपल्या पार्टनरच्या अंगावरील चिखल धुवून काढण्याचा टास्क देण्यात आला होता.

advertisement

( 'माझ्यावरचा हा कलंक...', 2 मुलांचा बाप अन् विनयभंगाचा आरोप? नोरा फतेहीच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवर खटला दाखल, नेमकं प्रकरण काय? )

याशिवाय आणखी एका टास्कमध्ये एका पुरुष स्पर्धकाला आपल्या पार्टनरचा टी-शर्ट हात न वापरता केवळ तोंडाच्या सहाय्याने काढायला सांगितला होता. हा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल झाला. तर आणखी एका टास्कमध्ये मुलांना तोंडात बर्फ धरून तो आपल्या पार्टनरच्या शरीरावर वितळवण्यास सांगितलं होतं.  अशा प्रकारच्या टास्कमुळे शोवरील वादात अडकला आहे.

advertisement

कॅमेऱ्यासमोर इतक्या उघडपणे इंटिमेट सीन दाखवल्याने प्रेक्षकांनी या शोला अश्लील ठरवलं आहे.  काहींनी सोशल मीडियावर थेट शो बंद करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी हा कार्यक्रम तरुण पिढीवर चुकीचा प्रभाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. एल्विश यादवला देखील यामुळे चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबास 13250 रुपये भाव, आले आणि द्राक्षाची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

दरम्यान, शोच्या निर्मात्यांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, या सर्व टास्कचा उद्देश स्पर्धकांमधील जवळीक वाढवणे हा आहे. कारण शोच्या शेवटी सहभागी जोडप्यांचा 'रोका' म्हणजेच साखरपुडा होणार आहे. त्यांच्या नात्यातील भावनिक आणि शारीरिक जवळीक वाढावी यासाठीच हे बोल्ड टास्क देण्यात आले आहेत. मात्र मनोरंजनाच्या नावाखाली मर्यादा ओलांडल्या जात असल्याची टीका प्रेक्षकांनी केली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
आधी तोंडाने कपडे काढले, मग अंघोळ घातली अन्... एल्विश यादवच्या शोवर नको ते दाखवलं; प्रेक्षक संतापले, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल