एका थिएटरचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ज्यात राडा झालेला पाहायला मिळतो आहे, माहितीनुसार एका वडिलांनी आपल्या मुलाला धुरंधर : द रिव्हेंज ही फिल्म दाखवण्यासाठी हा राडा घातला. बापलेक दोघं एकत्र फिल्म पाहायला गेले. पण तिथं त्यांना अडवण्यात आलं आणि मुलाच्या वडिलांनी असा गोंधळ घातला.
काय बोलताय हे तुम्ही! अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर डबल मिनिंग पोस्ट, नको नको तो अर्थ
advertisement
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बापलेक एकत्र फिल्म पाहायला गेले तर त्यांना अडवण्याचं कारण काय? तर मुलाचं वय 18 वर्षांपेक्षा कमी, तो अल्पवयीन आणि धुरंधर फिल्म ए रेडेट म्हणजे फक्त प्रौढ व्यक्तींसाठीच आहे. अल्पवयीन किंवा लहान मुलांसाठी नाही. म्हणून ही फिल्म पाहण्यापासून मुलाला रोखण्यात आलं. त्यांना थिएटरच्या आत एंट्री दिली नाही.
सीबीएफसी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेटच्या नियमानुसार अल्पवयीन मुलांना ही फिल्म पाहता येणार नाही. त्यांच्या वयाचा पुरावा दाखवावा लागेल. पण वडिलांनी अल्पवयीन मुलाला धुरंधर 2 दाखवण्याचा हट्टच धरला. पण त्याला रोखलं म्हणून त्यांनी थिएटरमध्येच राडा घातला.
ही घटना उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. एमर्ल्ड मॉलमधील आयनॉक्स मेगाप्लेक्समधील हे दृश्य. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
