शनिवारी 31 जानेवारीला रात्री मुंबईतील जुहू येथील रोहित शेट्टीच्या शेट्टी टॉवर या बिल्डिंगबाहेर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणात पुण्याहून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार असल्याचं सांगितलं जातं आहे.
Rohit Shetty : रोहित शेट्टीची 10 मजली इमारत; जिथं झाला गोळीबार किती आहे त्या 'शेट्टी टॉवर'ची किंमत?
advertisement
आरोपींनी रोहित शेट्टीला ठार मारण्याच्या उद्देशाने बंदुकीचा वापर करून अंदाधुंद गोळीबार केला असा आरोप त्यांच्यावर आहे. रोहित शेट्टीच्या सुरक्षा रक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींचा गुन्हेगारी टोळीशी संबंध
या प्रकरणातील आरोपींना पुण्यातील धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. या चौघांची पार्श्वभूमी, संपर्क आणि हालचाली संशयास्पद असल्याने पुणे पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली. चौकशीदरम्यान या आरोपींचे मुंबईतील गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असल्याचे चिन्ह दिसून आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही जण देशातील कुख्यात गँगशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी या आरोपींनी मुंबई क्राइम ब्रांचच्या ताब्यात देण्यात आलं.
पण रोहित शेट्टीच्या हत्येचा कट का रचला गेला? यामागील कारण काय आहे? खंडणी की आणखी काही? हे अद्याप समजलेलं नाही. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.
