सईने सांगितले की, या गाण्यासाठी तिने तब्बल 33 तासांचा सराव केला. लावणीची प्रत्येक अदा, नजाकत आणि ठसका तिने अत्यंत मेहनतीने आत्मसात केला आहे. या गाण्याला बेला शेंडे आणि रोहन प्रधान यांचा आवाज लाभला आहे. तर संगीत रोहन-रोहन यांचं आहे. गीत तेजस देऊस्कर यांनी लिहिलं असून काही ओळी रोहन गोखले यांनीही लिहिल्या आहेत. या लावणीची कोरिओग्राफी प्रसिद्ध लावणी डान्सर आशीष पाटीलनं केली आहे. लावणीच्या दुनियेत सईचं हे पहिलंच पाऊल असलं, तरी तिच्या आत्मविश्वासामुळे तिने हे अवघड कलेचं रुपडं सहजतेने पेललं आहे.
advertisement
सरकार विरोधी पोस्ट करणं भोवलं, किरण मानेंना मिळाली आयकर विभागाची नोटीस? काय आहे प्रकरण?
दरम्यान, 'अल्ट्रा मराठी बझ'ला दिलेल्या मुलाखतीत सईने आशीष पाटीलसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. सई म्हणाली, "मला बेस्ट कोरिओग्राफर मिळाला. त्याला मी खूप जास्त क्रेडिट देते. इतकं कोरिओग्राफर कलाकाराच्या जमेच्या बाजूंचा, त्याच्या स्टाइलचा विचार करून कोरिओग्राफी केली जाते. पण तो असा टीचर आहे, जो कॉम्प्रोमाइज करत नाही. त्याला एखादी स्टेप हवी तर ती तशीच हवी आणि मला त्याची ही क्वालिटी खूप आवडते. त्यामुळे आमचं खूप पटलं आणि ते रिफ्लेक्ट होईल अशी आशा आहे."
पहिल्यांदाच लावणी करण्याबद्दल सईने सांगितले, "'देवमाणूस' मध्ये लावणी करणे हा एक विलक्षण अनुभव होता. गाणं ऐकताच पायाखालची जमीनच सरकली. हे माझ्यासाठी नवीन होतं पण खूप मजा आली. लव्ह फिल्म्स आणि तेजसने माझ्यावर जो विश्वास ठेवला, त्यासाठी मी त्यांच्या खूप आभारी आहे."
'देवमाणूस' या चित्रपटात सईसोबत महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देऊस्कर यांनी केलं असून, निर्मिती लव्ह रंजन आणि अंकुर गर्ग यांची आहे.
