advertisement

Kiran Mane : सरकार विरोधी पोस्ट करणं भोवलं, किरण मानेंना मिळाली आयकर विभागाची नोटीस? काय आहे प्रकरण?

Last Updated:

Kiran Mane Income Tax Department Notice : अभिनेते किरण माने यांनी आयकर विभागाच्या नोटिसीबद्दल फेसबुकवर पोस्ट केली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

News18
News18
मुंबई : अभिनेते किरण माने हे मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय आक्रमक वृत्तीचे कलाकार मानले जातात. समाजातील अनेक समस्यांवर ते बेधडकपणे आपले मत मांडताना दिसतात. इतकंच नाही, तर ते सत्तेत असलेल्या पक्षांवर जळजळीत भाषेत टीकाही करतात. अनेकदा ते त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे चर्चेत येतात. असाच एक प्रसंग नुकताच घडला आहे, ज्याबाबत किरण यांनी त्यांच्या नव्या सोशल मिडिया पोस्टमध्ये सांगितले आहे.
किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी आयकर विभागाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, निमंत्रण आलंय… जाऊन येतो. सविस्तर वृत्तांत लवकरच कळवतो. जय शिवराय… जय भीम ! या पोस्टमध्ये त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे स्पष्ट होत नसलं, तरी नेटकरी असा अंदाज बांधत आहेत, की किरण माने यांना आयकर विभागाची नोटिस आली आहे.
advertisement
दरम्यान, काही तासांपूर्वीच किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी काही राजकीय आणि सामाजिक गटांवर टीकेचा बाण सोडला आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली असतानाच काही हिंदू संघटना आक्रमक होत आहेत. सोशल मीडियावर द्वेषयुक्त पोस्ट्स व्हायरल होत असताना, अभिनेते किरण माने यांनी यावर थेट भाष्य करत एक सडेतोड पोस्ट शेअर केली होती.
advertisement
किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये थेट विचारलंय की, “जेव्हा छत्रपती शिवरायांना आणि राजमाता जिजाऊंना अपमानित करणाऱ्यांना विशेष सुरक्षा दिली जात होती, तेव्हा कुठे होते हे तथाकथित हिंदुत्वाचे रक्षक?” त्यांनी अंतरवाली सराटीतील आंदोलन करणाऱ्या महिलांवर झालेल्या लाठीचार्जाचाही उल्लेख केला आणि त्या वेळी गप्प बसलेल्या नेत्यांना आज हिंदुत्वाच्या नावावर ओरड करताना खडेबोल सुनावले.
advertisement
त्यांनी म्हटलंय की, आज जर कुणी मुस्लीम समुदायाविरुद्ध द्वेष पसरवत असेल, तर त्यामागे काही काळं कारस्थान असल्याची शक्यता नाकारता येत नाही. “दाल में कुछ काला है,” असा थेट टोला त्यांनी लगावला आहे. याशिवाय त्यांनी देशातील सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन करत म्हटलं की, “ज्यावेळी काही तथाकथित हिंदुत्ववादी गप्प होते, तेव्हा मुस्लिम बांधव आमच्या पाठीशी उभे होते.”
advertisement
advertisement
या हल्ल्याच्या मुळाशी कोण आहे, त्यामागे कोणतं रचलेलं षड्यंत्र आहे, याचा सखोल तपास व्हावा आणि दोषींवर संविधानिक मार्गाने कारवाई व्हावी, अशी भूमिका माने यांनी मांडली आहे. पुलवामा हल्ल्याचा तपास अद्याप अपूर्ण असताना, पहलगाम हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण करणं धोकादायक असल्याचं ते म्हणाले.
या पोस्टच्या काही तासांनी किरण माने यांनी आयकर विभागातून आमंत्रण आल्याची एक पोस्ट शेअर केली. अनेकांना ही बाब खटकली आहे. दरम्यान, किरण माने आयकर विभागात का गेले होते, हे त्यांच्या नव्या पोस्टमधून लवकरच समोर येईल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kiran Mane : सरकार विरोधी पोस्ट करणं भोवलं, किरण मानेंना मिळाली आयकर विभागाची नोटीस? काय आहे प्रकरण?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement