advertisement

नोकरीसाठी अर्ज, पण बॅगेत एअरगन; संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयात थरार

Last Updated:

बॅग तपासली असता त्यामध्ये पिस्तूलसारखी दिसणारी वस्तू आढळून आली. यामुळे क्षणातच कार्यालयात एकच गोंधळ उडाला.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केणेकर यांच्या कार्यालयात एअरगन आढळून आल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली. सुरुवातीला पिस्तूल असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासणीनंतर ती एअरगन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी रितेश संतोष होळकर (वय २१) या तरुणाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, रितेश हा बी.एस्सी.च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असून तो काही दिवसांपासून नोकरीच्या शोधात होता. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत कंत्राटी तत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी त्याला भाजपचे आमदार संजय केणेकर यांचे शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार तो शुक्रवारी सायंकाळी केणेकर यांच्या कार्यालयात गेला होता. मात्र, काम उरकून निघताना त्याची बॅग कार्यालयातच राहिली.
advertisement

कार्यालयात मोठा गोंधळ

शनिवारी दुपारी आमदार केणेकर यांचे सहकारी कार्यालयात आल्यानंतर एका कोपऱ्यात ठेवलेली संशयास्पद बॅग त्यांच्या लक्षात आली. बॅग तपासली असता त्यामध्ये पिस्तूलसारखी दिसणारी वस्तू आढळून आली. यामुळे क्षणातच कार्यालयात एकच गोंधळ उडाला. संभाव्य धोक्याची शक्यता लक्षात घेता तत्काळ क्रांती चौक पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅग ताब्यात घेतली आणि तपास सुरू केला.
advertisement

एअरगन खरेदी केल्याची कबुली

प्राथमिक तपासात ती एअरगन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाचा शोध घेऊन रितेश संतोष होळकर याला ताब्यात घेतले. चौकशीत रितेशने सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून हौस म्हणून एअरगन खरेदी केल्याची कबुली दिली. नोकरीसंदर्भातील भेटीवेळी ती बॅग अनवधानाने कार्यालयात राहिल्याचेही त्याने सांगितले.

रितेशविरुद्ध गुन्हा दाखल

advertisement
या प्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात रितेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आमदार कार्यालयात अशा प्रकारे शस्त्रसदृश वस्तू सापडल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ही एअरगन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नोकरीसाठी अर्ज, पण बॅगेत एअरगन; संभाजीनगरमध्ये भाजप आमदाराच्या कार्यालयात थरार
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement