TRENDING:

Hera Pheri 3 Release: वाद मिटला, त्रिकूट पुन्हा एकत्र; हेरा फेरी 3 कधी होणार रिलीज? परेश रावलने सांगूनच टाकलं, म्हणाले, 'लवकरच पुढच्या...'

Last Updated:

Hera Pheri 3 Release Date: बॉलीवूडमधला सर्वात जास्त डिमांड असलेला कॉमेडी सिनेमा म्हणजे हेरा फेरी. आता हेरा फेरी 3 च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा सिनेमा कधीपर्यंत रिलीज होँणार याविषयी अपडेट समोर आलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलीवूडमधला सर्वात जास्त डिमांड असलेला कॉमेडी सिनेमा म्हणजे हेरा फेरी. या फ्रँचायझीने प्रेक्षकांच्या मनावर इतकी छाप पाडली की लोक आजही बाबू भैय्याचं "उठ लै रे!" किंवा राजूच्या क्लूलेस चेहऱ्यावर हसतात. आता हेरा फेरी 3 च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा सिनेमा कधीपर्यंत रिलीज होँणार याविषयी अपडेट समोर आलीय.
हेरा फेरी 3 कधी होणार रिलीज?
हेरा फेरी 3 कधी होणार रिलीज?
advertisement

या चित्रपटाबाबत काही काळापूर्वी वाद निर्माण झाला होता. परेश रावल यांनी अचानक चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी आली होती. सोशल मीडियावर चाहत्यांनी यावर संताप व्यक्त केला. लोक म्हणत होते की हे सगळं एक 'पब्लिसिटी स्टंट' आहे. पण आता खुद्द अक्षय कुमारने यावर भाष्य करत स्पष्ट केलं आहे की, "हे प्रसिद्धीसाठी नव्हतं. हे प्रकरण कायदेशीर पातळीवर गेलं होतं. पण आता सर्व काही ठीक आहे."

advertisement

श्रावणातील उपवास मटण खाऊन सोडला, अभिनेत्रीने शेअर केला VIDEO, नेटकऱ्यांनी घेतलं धारेवर

परेश रावल यांनी नुकतंच एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत लिहिलं "लवकरच, पुढच्या पावसाळ्यापूर्वी." त्यामुळे अनेकांनी अंदाज लावला की 2026 च्या सुरुवातीला हेरा फेरी 3 थिएटरमध्ये झळकणार. चित्रपटात पुन्हा एकदा 'बाबू भैय्या' (परेश रावल), 'श्याम' (सुनील शेट्टी) आणि 'राजू' (अक्षय कुमार) हे तीन मस्त मित्र दिसणार आहेत. नव्या भागात काही नवीन पात्रांची एंट्री होईल का, हे अजून गुलदस्त्यात आहे.

advertisement

दरम्यान, चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत असून, यावेळी कथा अधिक भन्नाट आणि आटपाट नगरीत नेणारी असेल, अशी चर्चा आहे. फॅन्ससाठी ही एक नॉस्टॅल्जिक ट्रिप असणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महाराष्ट्रातील असं एक गाव, जिथे घराच्या छतावर कोणीच लावत नाही कवेलू, काय आहे परंपरा?
सर्व पहा

'हेरा फेरी' आणि 'फिर हेरा फेरी' या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना खूप हसवले होते आणि त्यांचे डायलॉग्स आजही मीम्सच्या माध्यमातून लोकप्रिय आहेत. राजू, श्याम आणि बाबूराव या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे, हे तिघे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याने प्रेक्षक 'हेरा फेरी 3' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Hera Pheri 3 Release: वाद मिटला, त्रिकूट पुन्हा एकत्र; हेरा फेरी 3 कधी होणार रिलीज? परेश रावलने सांगूनच टाकलं, म्हणाले, 'लवकरच पुढच्या...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल