झुंड चित्रपटातील एका कलाकाराची अशाप्रकारे हत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पण मयत प्रियांशूचा देखील खुंखार इतिहास राहिला आहे. त्याने आपलं टॅलेंट गुन्हे करण्यासाठी वापरलं. चित्रपटात काम केल्यानंतर देखील त्याने गुन्हेगारी सोडली नाही. चित्रपट आल्यानंतरही त्याला एका प्रकरणात अटक झाली होती. अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांसोबत त्याचा वावर होता.
हिरो नव्हे व्हिलनच
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशू छेत्री हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल १५ गुन्हे दाखल आहेत. घरफोडी आणि चोरीसह सुमारे १५ गुन्हे दाखल आहेत. ज्याने प्रियांशूची हत्या केली, तो ध्रुव साहू देखील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.
नेमकं हत्या कशी झाली?
जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा परिसरातील गंगोत्री लॉनजवळ ध्रुव साहूने नावाच्या मित्राने प्रियांशची हत्या केली आहे. प्रियांशू हा काही दिवसांपूर्वी नारा रोड परिसरात राहायला आला होता. याच परिसरात आरोपी देखील राहत होता. दोघांमध्ये चांगली मैत्री होती. नारा रोड परिसरात यायच्या आधी प्रियांशू लुंबिनी नगरमध्ये त्याच्या कुटुंबासह राहत होता.
आधी तारेनं बांधलं मग खेळ खल्लास
मंगळवारी मध्यरात्रीनंतर ध्रुव शाहू आणि प्रियांशु छेत्री यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. ध्रुव यांनी छेत्रीवर तारेने हल्ला केला, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. प्रियांशु त्याला मारेल या भीतीने आरोपीने प्रथम त्याला तारेने बांधले आणि नंतर त्याची हत्या केली. परिसरातील रहिवाशांनी त्याला जिवंत असल्याचे समजून रुग्णालयात नेले. मात्र प्राथमिक तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून, जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या हत्येप्रकरणी आणखी संशयित असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.