खरं तर, प्रियांशू छेत्री याची पार्श्वभूमी कायमच गुन्हेगारीची राहिली आहे. पण नागराज मंजुळे यांनी त्याच्यातील टॅलेंट हेरून त्याला एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला. बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी प्रियांशूली मिळाली. पण महानायकाच्या सहवासात राहूनही प्रियांशू सुधारला नाही. नागराज मंजुळे यांचा हा हिरो वास्तवात व्हिलनच राहिला आणि व्हिलनगिरीच्या नादातच त्याची हत्या झाल्याची आता खळबळजनक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
advertisement
एक चूक अन् खेळ खल्लास
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी प्रियांशू आणि त्याचा मित्र ध्रुव साहू दोघंही एमडी ड्रग्जचं सेवन करत होते. यावेळी दोघांमध्ये नशेत वाद झाला. या वादात प्रियांशूने केलेल्या एका चुकीमुळे त्याचा जीव गेल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
खरं तर, चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहवासात असूनही प्रियांशूच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. चित्रपटाच्या शूटींगनंतर काही दिवसांतच एका चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. तरीही त्याची खोड मोडली नाही. त्याचं व्यसनही सुटलं नाही. बुधवारी झालेल्या त्याच्या हत्या होण्यामागे ही एमडीच्या व्यसनाचा वादच कारणीभूत ठरल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.
प्रियांशूने त्याचा मित्र आरोपी ध्रुवसोबत एमडीच्या नशेत वाद घातला होता. वादानंतर प्रियांशूने चाकू काढल्याने संतप्त ध्रुवने त्याला वायरने बांधून चाकूने वार केले आणि नंतर दगडाने डोके ठेचले. त्याची हत्या केली असं पोलीस तपासात समोर येत आहे. नशेत असताना चाकू काढणं त्याच्या जीवावर बेतलं. त्याच्या याच व्हिलनगिरीमुळे त्याची हत्या झाल्याचं तपासात समोर आलं आहे.