1970 मध्ये एका खूप मोठ्या उद्योगपतीनं त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या लग्नाचं निमंत्रण लता मंगेशकर आणि आशा भोसले यांना दिलं होतं. तसंच या लग्नात लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गाणं म्हणावं, अशी उद्योगपतीची इच्छा होती, व त्यासाठी तो मोठी रक्कम देण्यास तयार होता. मात्र, लतादीदींनी हे निमंत्रण नाकारलं. विशेष म्हणजे लग्नात गाणं म्हणण्यासाठी मंगेशकर यांना एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्यानं त्या खूपच संतप्त झाल्या होत्या. लता मंगेशकर यांना लग्नात गाणं म्हणायचं नव्हतं.
advertisement
हेही वाचा - Lata Mangeshkar: रेकॉर्डिंगआधी न विसरता हे काम करायच्या लतादीदी, वाचून तुम्हीही व्हाल थक्क
गायिका आशा भोसले यांनी एका कार्यक्रमात या घटनेचा उल्लेख केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ‘मला व लतादीदींना कोणीतरी लग्नाला बोलावलं होतं. या लग्नात गाणं गाण्यासाठी ती व्यक्ती आम्हाला काही लाख डॉलर्स देत होती. आम्हाला आमंत्रण देणाऱ्या व्यक्तीची इच्छा होती की लग्नात आम्ही दोघींनी यावं आणि गाणं म्हणावं. लग्नात गाणं गाण्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर लतादीदींनी मला विचारलं, 'लग्नात गाणार का?' मी म्हणाले, मी नाही गाणार. त्यानंतर लतादीदी संबंधित उद्योगपतीच्या मॅनेजरला म्हणाली, ‘तुम्ही 100 मिलियन डॉलर्स दिले तरी आम्ही लग्नात गाणार नाही. कारण आम्ही लग्नसमारंभात गात नाही.’
लतादीदी आशा भोसले यांच्यापेक्षा चार वर्षांनी होत्या मोठ्या
‘लतादीदी माझ्यापेक्षा फक्त 4 वर्षांनी मोठ्या होत्या,’ असे सांगतानाच गायिका आशा भोसले पुढे म्हणाल्या, ‘आई-वडिलांच्या पायाला स्पर्श करून पाणी पिणारी मुलं आयुष्यात मोठी उंची गाठतील,’ असं लतादीदी नेहमी म्हणत असे. आम्ही कोल्हापुरात राहत होतो, तेव्हा एके दिवशी लतादीदीनं मला एका भांड्यात थोडं पाणी आणण्यास सांगितलं. हे पाणी लतादीदीनं आमच्या आई-वडिलांच्या पायावर ओतलं. मग आम्ही दोघींनी ते पाणी आमच्या तळहातात घेतलं आणि ते प्राशन केलं. आजची पिढी हे करणार नाही.’
