जेव्हा ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर मुंबईत पोहोचली तेव्हा लोकांना वाटले की ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करेल, परंतु अभिनेत्रीने एएनआयला सांगितले की तिचा बॉलिवूडमध्ये येण्याचा कोणताही विचार नाही. त्यानंतर ती संन्यास घेणार असल्याच्या बातमीने खळबळ माजली. याच पार्श्वभूमीवर ममता कुलकर्णीची एकूण संपत्ती किती आहे ते जाणून घेऊया.
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ममता कुलकर्णीची एकूण संपत्ती १० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ८५ लाख रुपये इतकी सांगितली जात आहे. इतकी वर्षे बॉलिवूडपासून लांब राहूनही ममताची आर्थिक बाजू अतिशय मजबूत आहे. २००० दशकाच्या सुरुवातीला तिने सिनेसृष्टी सोडली होती.
advertisement
‘बाजी’, ‘आंदोलन’ आणि ‘करण-अर्जुन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या. २००० कोटी रुपयांच्या ड्रग स्मगलिंग प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्रीने देश सोडला होता.
ममता कुलकर्णीचे आयुष्य आव्हाने आणि वादांनी भरलेले आहे. २०१५ मध्ये ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव समोर आल्यानंतर ती कायदेशीर अडचणीत अडकली. या घटनांनी तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. मात्र, या कठीण परिस्थितीने तिला अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा दिली.
ममता कुलकर्णीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात १९९२ मध्ये आलेल्या 'तिरंगा' या सिनेमातून केली होती, ज्यामध्ये तिने नाना पाटेकर यांच्यासोबत काम केले होते. यानंतर ती 'अशांत', 'आशिक आवारा' आणि 'वक्त हमारा है' सारख्या हिट चित्रपटांमध्ये दिसली. ९० च्या दशकात तिची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती आणि तिने इंडस्ट्रीत स्वतःची खास ओळख निर्माण केली होती.
