दरम्यान, सैफ अली खानवर इतका घातक हल्ला झाल्यानंतरही त्याची पहिली पत्नी अमृता सिंगने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात सैफने अमृताला त्याच्या दुसऱ्या लग्नाची बातमी कळल्यावर तिने काय केले होते हे सांगितले आहे.
'कॉफी विथ करण'च्या एका भागात अभिनेता सैफ अली खान त्याची मुलगी सारा अली खानसोबत आला होता. त्यावेळी त्याने त्याच्या दुसऱ्या लग्नासंबंधी खुलासा केला होता. सैफने सांगितले की करीनाशी लग्न करण्याआधी त्याने त्याची पहिली बायको अमृता सिंगला पत्र लिहिले होते.
advertisement
308 गर्लफ्रेंड्स, 3 मुलींशी लग्न, लेकाचं करिअर वाचवताना सुपरस्टार बापाच्या आले नाकी नऊ
सैफ म्हणाला, "करीनाशी लग्न करण्याआधी मी अमृताला पत्र लिहिले होते. मी पत्रात लिहिले की अमृता तुला माहितच आहे की माझ्या आयुष्यातील एक नवा पाठ सुरू होत आहे. भूतकाळात आपल्या दोघांमध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत." सैफने या पत्रात त्याच्या भूतकाळाशी संबंधित अनेक गोष्टी लिहिल्या होत्या आणि अमृताला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या.
सैफ हे पत्र करीनाकडे घेऊन गेला आणि तिला सांगितले की हे पत्र वाच, मी हे पत्र अमृताला पाठवण्याचा विचार करत आहे. करीनाने यावर खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिली. अमृताला हे पत्र पाठवल्यानंतर साराने सैफला कॉल केला. ती म्हणाली, "मी तुमच्या लग्नाला येणारच होते. पण आता मी मोकळ्या मनाने या लग्नाला येईन."
खरं तर या लग्नासाठी साराची तयारी तिची आई अमृता सिंगने केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृता सिंगने डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांना फोन करून सांगितले होते की, "सैफ अली खान लग्न करणार आहे आणि या लग्नात साराने सर्वात सुंदर लेहेंगा परिधान करून जावे अशी माझी इच्छा आहे." सारा अली खानने तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नात निऑन ग्रीन आणि पिंक कलरचा अनारकली सूट परिधान केला होता. साराने हा डिझायनर अनारकली सूटवर डायमंड नेकलेस, मांगटीका आणि ड्रेसला मॅचिंग कानातले होते.
