दरम्यान आता समोर आलेल्या माहितीनुसार, सैफच्या घरातून जवळपास २०० पेक्षा जास्त बोटांचे, पायांचे ठसे घेण्यात आलेत. पायऱ्या, पायऱ्यांजवळील भिंत, बाथरूम डक, घराच्या बाहेरील, घराच्या आतील दरवाजे त्यावरील हँडल, बाथरूम, फर्निचर, खिडकी, डायनिंग टेबल, खुर्च्या, कपाटे अशा अनेक ठिकाणांवरून २०० पेक्षा जास्त हातांचे, बोटांचे ठसे घेण्यात आलेत. यातील बहुतांश ठशांशी आरोपी शरीफुलचे ठसे मॅच झाले नाहीत, अन्य १०० ठशांची तपासणी सुरू आहे. त्याचा अहवाल लवकरच येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
Salman Khan : 'या' 2 सुपरस्टार्सना सलमान खान मानतो देव, त्यांच्यापेक्षा मोठं कोणीही नाही
पोलिसांनी पुढे सांगितले की, “घटनास्थळी झटापट झाली, अनेकांचा वावर झालाय. यामुळे एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त तसंच अस्पष्ट असे बोटांचे ठसे मिळाले आहेत. यामुळे ठशांच्या तपासणीस वेळ जातोय. ठसे हा महत्त्वाचा पुरावा या प्रकरणात आहे. पण याहीपेक्षा अनेक महत्त्वाचे पुरावे या प्रकरणी आमच्या हाती लागलेत. त्यामुळे या प्रकरणी कोर्टात पोलिसांची बाजू सक्षमपणे आम्ही मांडू शकतो.”
घटना घडल्यावर पोलिसांना आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज सापडले. पकडलेल्या एकाही आरोपीचा चेहरा त्या चेहऱ्याशी मॅच होत नव्हता. फक्त शरीफुलचा चेहरा सीसीटीव्हीतील आरोपीशी जवळपास मिळताजुळता आहे. तर, ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी फक्त शरीफुल याचे मोबाईल टॉवर लोकेशन सैफच्या घराच्या आजूबाजूला आणि घरात देखील मिळाले आहे. आरोपी शरीफुलने सैफवर हल्ला केला होता. तो हत्यार हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय. ते हत्यार फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलंय. हा सगळ्यात मोठा पुरावा आहे या प्रकरणी जो पोलिसांच्या हाती लागला आहे.
