ओटीटीवरील या फिल्मचं नाव 'होमबाउंड' असं आहे. या फिल्मची कथा मोहम्मद शोएब (ईशान खट्टर) आणि चंदन कुमार (विशाल जेठवा) या दोन मित्रांची आहे. दोघेही पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र समाजातील जुन्या अडथळ्यांमुळे, जसे की जात आणि धार्मिक भेदभाव, त्यांच्या वाटेत वारंवार अडचणी येतात. शोएबला त्याच्या धार्मिक ओळखीमुळे आणि चंदनला त्याच्या जातीमुळे रोखले जाते. हा संघर्ष आपल्याला विचार करायला भाग पाडतो की खरोखर कष्ट आणि चिकाटी पुरेशी असते का, की समाजातील या जुन्या बेड्या आपल्या स्वप्नांपेक्षा मोठ्या ठरतात? सुधा भारती (जान्हवी कपूर) ही व्यक्तिरेखा कथेत आशेचा किरण बनून समोर येते. ती अडचणींशी झुंज देत असतानाही मोठी स्वप्ने पाहते.
advertisement
IMDb वर मिळाले जबरदस्त रेटिंग
'होमबाउंड' या फिल्मला IMDb वर 8 रेटिंग मिळाले आहे. ज्यामुळे ती या वर्षातील सर्वाधिक IMDb रेटिंग मिळवणारी हिंदी फिल्म ठरली आहे. याचा सरळ अर्थ असा की प्रेक्षकांना ही कथा खूप आवडली आहे. बॉक्स ऑफिसवर फिल्म फारशी यशस्वी ठरली नसली, तरी समीक्षकांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. OTT वरही या फिल्मला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
'होमबाउंड' या फिल्मच्या दिग्दर्शनाची धुरा नीरज घेवान यांनी सांभाळली आहे. ज्यांनी हिंदी सिनेमाला मसान (2015) सारखी उत्कृष्ट फिल्म दिली आहे. होमबाउंडची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. ही फिल्म सातत्याने चर्चेत आहे. होमबाउंड भारतात 26 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झाली होती. या फिल्मला परदेशातील अनेक प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल्समध्ये दाखवण्यात आले आहे.
कान्स आणि टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये होमबाउंड
मे महिन्यात झालेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये होमबाउंडची निवड करण्यात आली होती. 78 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फिल्म पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सुमारे नऊ मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवत टीमचे अभिनंदन केले. हा क्षण संपूर्ण टीमसाठी अत्यंत भावनिक होता. जान्हवी कपूर, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा यांच्या होमबाउंडची निवड टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) 2025 साठीही झाली होती. TIFF गाला प्रेझेंटेशनमध्येही ही फिल्म दाखवण्यात आली. 50व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही तिला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. याशिवाय, TIFF पीपल्स चॉइस इंटरनॅशनल अवॉर्डसाठी ही फिल्म शॉर्टलिस्ट झाली होती आणि सेकंड रनर-अप घोषित करण्यात आली होती.
OTT वर ही फिल्म कुठे पाहाल?
'होमबाउंड' ही फिल्म प्रेक्षकांना आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात नेटफ्सिक्सवर पाहायला मिळेल. ही फिल्म पाहून तुम्ही तिच्या भावनिक कथेशी सहजपणे जोडले जाऊ शकता. आता ही फिल्म 98व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मसाठी भारताची अधिकृत एन्ट्री आहे.
