Skin Care Tips : चेहऱ्याला सतत ब्लिच करत आहात? तर आताच थांबा, नाहीतर होतील हे गंभीर परिणाम 

Last Updated:

त्वचा उजळ दिसावी, चेहऱ्यावरील टॅनिंग कमी व्हावी, चेहऱ्यावरील केसांचा रंग फिकट व्हावा यासाठी अनेकजण फेशियल आणि ब्लिचचा वापर करतात. ब्लिचमध्ये वेगवेगळे केमिकल असतात. त्यामुळे त्वचेला हानी पोहचते. 

+
Skin

Skin Care Tips 

अमरावती : सद्यस्थितीमध्ये अनेकजण सौंदर्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. त्वचा उजळ दिसावी, चेहऱ्यावरील टॅनिंग कमी व्हावी, चेहऱ्यावरील केसांचा रंग फिकट व्हावा यासाठी अनेकजण फेशियल आणि ब्लिचचा वापर करतात. मात्र तात्काळ परिणाम देणारे हे ब्लिच दीर्घकाळ त्वचेसाठी कितपत सुरक्षित आहे? हा देखील एक प्रश्न उभा राहतो. कारण ब्लिचमध्ये वेगवेगळे केमिकल असतात. त्यामुळे त्वचेला हानी पोहोचते, असं डॉक्टरांकडून सांगण्यात येते. याबाबत अधिक माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
ब्लिच म्हणजे काय?
याबाबत माहिती देताना त्या त्वचारोग तज्ज्ञ सांगतात की, ब्लिच ही एक रासायनिक प्रक्रिया असून त्यामध्ये चेहऱ्यावरील केसांचा रंग फिकट केला जातो. त्यामुळे त्वचा काही काळासाठी उजळ व स्वच्छ दिसते. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड, अमोनिया यांसारखी रसायने वापरली जातात. ब्लिचमध्ये देखील अमोनिया असतो.
advertisement
ब्लिच केल्यानंतर आपल्या चेहऱ्यात काय बदल होतात?
चेहऱ्यावरील बारीक केसांचा रंग फिकट होतो. त्वचा तात्पुरती उजळ दिसते. तात्काळ ग्लो मिळाल्यासारखा भास होतो. कार्यक्रम, लग्नसराईसाठी झटपट उपाय म्हणून ब्लिच वापरतात. मात्र हे फायदे फक्त तात्पुरते असल्याचे त्वचारोग तज्ज्ञ सांगतात.
ब्लिच केल्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
तज्ज्ञांच्या मते, वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने ब्लिच केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. सर्वात पहिले म्हणजे त्वचेला जळजळ होणे आणि खाज सुटणे. संवेदनशील त्वचेसाठी ब्लिच अतिशय हानिकारक ठरू शकते.
advertisement
त्यानंतर त्वचेवर लालसरपणा व सूज देखील येऊ शकते. काही वेळा ब्लिच केल्यानंतर चेहरा लाल होणे, सूज येणे अशी लक्षणे दिसतात. तसेच ब्लिच केल्यास त्वचा कोरडी आणि निस्तेज देखील होऊ शकते. रसायनांमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्याचबरोबर पिंपल्स व पुरळ देखील वाढतात. ब्लिचमुळे त्वचेची संरक्षणक्षमता कमी होऊन पुरळ वाढू शकतात.
advertisement
नेहमी ब्लिच केल्याने त्वचेचा नैसर्गिक रंग बदलण्याची शक्यता असते. सतत ब्लिच केल्यास त्वचा डागाळलेली दिसू शकते. तसेच अनेकांना ऍलर्जी देखील होऊ शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, ब्लिच केल्याने त्वचा उजळ होते हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात केवळ केसांचा रंग फिकट होतो. वारंवार ब्लिच करणे त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते.
त्याऐवजी तुम्ही नैसर्गिक फेस पॅक वापरू शकता. नियमित सनस्क्रीनचा वापर करा. योग्य स्किन केअर रूटीन ठरवून घ्या. तसेच कोणताही स्किन प्रॉब्लेम असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करून घ्या, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care Tips : चेहऱ्याला सतत ब्लिच करत आहात? तर आताच थांबा, नाहीतर होतील हे गंभीर परिणाम 
Next Article
advertisement
Dharashiv News: तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळल्या!
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु
  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

  • तुळजापूर ड्रग्स प्रकरणाला नवा ट्वीस्ट, १० महिने फरार असलेल्या मास्टरमाईंडच्या मु

View All
advertisement