ब्लिच म्हणजे काय?
याबाबत माहिती देताना त्या त्वचारोग तज्ज्ञ सांगतात की, ब्लिच ही एक रासायनिक प्रक्रिया असून त्यामध्ये चेहऱ्यावरील केसांचा रंग फिकट केला जातो. त्यामुळे त्वचा काही काळासाठी उजळ व स्वच्छ दिसते. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड, अमोनिया यांसारखी रसायने वापरली जातात. ब्लिचमध्ये देखील अमोनिया असतो.
एक दोन नव्हे तब्बल 500 गुलाब, सोलापुरात भरलंय प्रदर्शन, काय आहे खास?
advertisement
ब्लिच केल्यानंतर आपल्या चेहऱ्यात काय बदल होतात?
चेहऱ्यावरील बारीक केसांचा रंग फिकट होतो. त्वचा तात्पुरती उजळ दिसते. तात्काळ ग्लो मिळाल्यासारखा भास होतो. कार्यक्रम, लग्नसराईसाठी झटपट उपाय म्हणून ब्लिच वापरतात. मात्र हे फायदे फक्त तात्पुरते असल्याचे त्वचारोग तज्ज्ञ सांगतात.
ब्लिच केल्यास होणारे दुष्परिणाम कोणते?
तज्ज्ञांच्या मते, वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने ब्लिच केल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. सर्वात पहिले म्हणजे त्वचेला जळजळ होणे आणि खाज सुटणे. संवेदनशील त्वचेसाठी ब्लिच अतिशय हानिकारक ठरू शकते.
त्यानंतर त्वचेवर लालसरपणा व सूज देखील येऊ शकते. काही वेळा ब्लिच केल्यानंतर चेहरा लाल होणे, सूज येणे अशी लक्षणे दिसतात. तसेच ब्लिच केल्यास त्वचा कोरडी आणि निस्तेज देखील होऊ शकते. रसायनांमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्याचबरोबर पिंपल्स व पुरळ देखील वाढतात. ब्लिचमुळे त्वचेची संरक्षणक्षमता कमी होऊन पुरळ वाढू शकतात.
नेहमी ब्लिच केल्याने त्वचेचा नैसर्गिक रंग बदलण्याची शक्यता असते. सतत ब्लिच केल्यास त्वचा डागाळलेली दिसू शकते. तसेच अनेकांना ऍलर्जी देखील होऊ शकते. त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, ब्लिच केल्याने त्वचा उजळ होते हा गैरसमज आहे. प्रत्यक्षात केवळ केसांचा रंग फिकट होतो. वारंवार ब्लिच करणे त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते.
त्याऐवजी तुम्ही नैसर्गिक फेस पॅक वापरू शकता. नियमित सनस्क्रीनचा वापर करा. योग्य स्किन केअर रूटीन ठरवून घ्या. तसेच कोणताही स्किन प्रॉब्लेम असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करून घ्या, अशी माहिती त्वचारोग तज्ज्ञांनी दिली.





