TRENDING:

BAFTA पुरस्कार सोहळ्यात ‘बुंग’ चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर PM मोदींची पोस्ट; म्हणाले, "भारतीयांसाठी आनंदाचा क्षण..."

Last Updated:

बाफ्टा पुरस्कार सोहळ्यामध्ये सध्या एका भारतीय फिल्मची जोरदार चर्चा होतेय. 'बूंग' असं या चित्रपटाचं नाव आहे. चित्रपटाचं खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या टीमचं भरभरून कौतुक केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फिल्म इंडस्ट्रीतील मानाचा पुरस्कार समजला जाणारा बाफ्टा पुरस्कार 2026 नुकताच पार पडला. लंडनमध्ये 'ब्रिटीश अकादमी फिल्म अवॉर्ड्स 2026' हा पुरस्कार सोहळा 22 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये सध्या एका भारतीय फिल्मची जोरदार चर्चा होतेय. तो बॉलिवूड इंडस्ट्रीतला चित्रपट नसून मणिपूरी इंडस्ट्रीतील हा चित्रपट आहे. या मणिपूरी चित्रटाचं नाव, 'बूंग' (Boong) असं आहे. या चित्रपटाचं खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या टीमचं भरभरून कौतुक केलं आहे.
News18
News18
advertisement

खरंतर, ब्रिटीश अकादमी फिल्म अवॉर्ड्स 2026 (बाफ्टा) मध्ये भारताने मोठा विजय मिळवला आहे. "बूंग" या मणिपुरी चित्रपटाला बेस्ट चिल्ड्रन अँड फॅमिली फिल्म कॅटेगरीमध्ये जिंकून इतिहास रचला. एखाद्या भारतीय चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल चित्रपटातल्या कलाकारांचे कौतुक केले आहे. पंतप्रधानांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये चित्रपटातल्या सर्व कलाकारांचे अभिनंदन करत त्यांच्या अभिनयाचे सुद्धा त्यांनी कौतुक केले आहे.

advertisement

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "चित्रपटाशी संबंधित प्रत्येकाचे मी अभिनंदन करतो. सर्वांसाठी हा खरोखरच खूप आनंदाचा क्षण आहे, विशेषतः मणिपूरमधील नागरिकांसाठी. हा चित्रपट देशातील सर्वच नागरिकांमध्ये असलेल्या कलात्मक गुणांचे दर्शन घडवतो." चित्रपटाच्या लेखिका आणि दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांचा हा दिग्दर्शन क्षेत्रातला पहिलाच चित्रपट होता. सध्या सर्वच स्तरातून दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांचे कौतुक केले जात आहे. लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या पुरस्कार सोहळ्यासाठी 'बूंग' या मणिपुरी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

advertisement

'बूंग' चित्रपटाचं कथानक काय?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंबला 13000 रुपये भाव, आल्याचे दरही सुधारले, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

मणिपूरमधील एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटाचं कथानक आहे. 'बूंग' चित्रपटाचं कथानक कौटुंबिक आणि भावनिक आहे. चित्रपटाची कथा 'बूंग' नावाच्या एका छोट्या मुलाभोवती फिरते. त्याची भूमिका गुगुन किपगेन नावाच्या एका बाल कलाकारानं साकारली आहे. 'बूंग' त्याच्या एकट्या आईसोबत राहायला असतो. तो आणि त्याची आई असे दोघंही आपल्या हरवलेल्या वडिलांना शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात. चित्रपटाची निर्मिती फरहान अख्तर, विकेश भूटानी, एलन मॅकएलेक्स, रितेश सिधवानी आणि शूजात सौदागर यांनी केली आहे. यापूर्वी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग 2024 साली टोरंटो आंतरराष्ट्रीय फिल्म अवॉर्ड्समध्येही डिस्कव्हरी सेक्शनसाठी करण्यात आले होते.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
BAFTA पुरस्कार सोहळ्यात ‘बुंग’ चित्रपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर PM मोदींची पोस्ट; म्हणाले, "भारतीयांसाठी आनंदाचा क्षण..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल