‘मोस्टलीसेन’ या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या प्राजक्ताने नुकताच एक फनी रील शेअर केला आहे, जो नेटिझन्सच्या पसंतीस उतरतो आहे. या रीलमध्ये ती एकदम नवविवाहित स्त्रीच्या भूमिकेत दिसते, जी ‘रोमँटिक लाईफ’च्या कल्पनेतून प्रत्यक्षात ‘गेमिंग मॅन’सोबतची रिअॅलिटी फेस करत आहे!
व्हिडिओमध्ये प्राजक्ता हताश चेहऱ्याने वाईनची बाटली उचलते आणि थेट तोंडाला लावते, तर तिचा नवरा वृषांक शांतपणे सोफ्यावर बसून व्हिडिओ गेम खेळतो. प्राजक्ता त्याला वाईनचा ग्लास देते आणि स्वतः मात्र संपूर्ण बाटली तोंडाला लावते! त्या व्हिडिओवर ती लिहिते – "जेव्हा तू सूर्यास्ताच्या फोटोंसाठी लग्न करतेस आणि आता तुला प्रत्यक्षात एका मुलासोबत राहावं लागतं!"
advertisement
हा व्हिडिओ शेअर करताना प्राजक्ताने ‘थू थू थू थू’ असं कॅप्शन दिलं आहे, ज्याचा अर्थ "नजर लागू नये" असा होतो. यासोबतच तिने ‘वाईट नजर’चा इमोजीही दिला आहे. व्हिडिओच्या पार्श्वभूमीला ‘कभी खुशी कभी गम’ मधलं ‘बोले चूड़ियां’ गाणं चालू आहे, पण हे गाणं गाणारी मुलगी गाताना चक्क चिडचिड करून ओरडते. हा एकदम भन्नाट ट्विस्ट होता!
प्राजक्ता आणि वृषांकची प्री-वेडिंग सेरेमनी २३ फेब्रुवारीला सुरू झाली होती आणि २५ तारखेला दोघं विवाहबंधनात अडकले. या खास प्रसंगी मिथिला पालकर, मल्लिका दुआ, सुशांत दिवगीकर आणि सारांश गोइला यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
वृषांक खनाल हा व्यावसायिकरित्या वकील असून, दोघांनी अनेक वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. आता लग्नानंतर प्राजक्ताने आपल्या इंस्टाग्रामवरून सगळ्या नवविवाहितांना एक मोठा विनोदी रिअॅलिटी चेक दिला आहे आणि प्रेक्षकांनीही त्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलंय.
