वास्तविक घटनेवर आधारित सीरिज असलेली ही 'भय' ही हॉरर-थ्रिलर सीरिज 12 डिसेंबर रोजी रिलीज झाली आहे. या सीरिजमध्ये दिल्लीतील एका मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे 8 भागांची ही सीरिज सत्य घटनेवर आधारित आहे. म्हणजेच यात दाखवलेले अनेक प्रसंग खऱ्या आयुष्याशी संबंधित आहेत. दिल्लीचा हा मुलगा पायलट बनण्याचं स्वप्न पाहतो आणि विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी लंडनला जातो. मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्याच्यासोबत अशा काही घटना घडतात, ज्या त्याला आतून पूर्णपणे हादरवून टाकतात. यानंतर त्याचं पायलट बनण्याचं स्वप्न बदलून तो पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर बनतो. पुढे तो भूत-प्रेतांशी संवाद साधणारा आणि आत्म्यांना मुक्ती देणारा व्यक्ती बनतो.
advertisement
दुसऱ्या जगातील लोकांशी संपर्क
हा मुलगा आपल्या मित्रांसोबत मिळून दुसऱ्या जगातील लोकांशी संपर्क साधतो. तो भयाण आणि भुताटकी ठिकाणी जातो आणि ज्या लोकांना अलौकिक घटनांवर नियंत्रण ठेवता येत नाही अशांची मदत करतो. मात्र अशाच एका केसमध्ये तपास करत असताना या इन्व्हेस्टिगेटरचाही मृत्यू होतो. होय, ही सीरिज प्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर गौरव तिवारी यांच्या आयुष्यावर आधारित आहे, ज्यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता.
ओटीटीवर प्रदर्शित होताच या सीरिजने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून ती मोठ्या प्रमाणात पाहिली जात आहे. तुम्हालाही ही सीरिज पाहायची असेल, तर तुम्ही ती अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ किंवा एमएक्स प्लेयरवर पाहू शकता. ‘भय: द गौरव तिवारी मिस्ट्री’ या सीरिजमध्ये करण टॅकर यांनी गौरव तिवारी यांची भूमिका साकारली आहे, तर त्यांच्यासोबत कल्की कोचलिनही प्रमुख भूमिकेत आहेत. आयएमडीबीवरही या सीरिजला 10 पैकी 8.8 रेटिंग मिळाली आहे.
