फोटोतील मुलगा कोण?
या हिरोच्या नायक म्हणून कारकिर्दीला मोठं यश मिळालं नाही. त्याने काही चित्रपट केले पण तो कधीच पहिल्या रांगेत पोहोचू शकला नाही. त्याने अभिनेता होण्यापेक्षा दिग्दर्शक होणं पसंत केलं. तो स्वत: दिग्दर्शनात यशस्वी झालाच पण त्याने त्याच्या मुलाला देखील त्याच्या पहिल्याच सिनेमात स्टार बनवलं.
( आधी कमल हासनसोबत केलं काम, नंतर त्यालाच आपल्या इशाऱ्यावर नाचवलं; हा मुलगा कोण! )
advertisement
राकेश रोशनचा प्रवास
फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा म्हणजेच अभिनेते, दिग्दर्शक, निर्माता राकेश रोशन. त्यांचा जन्म 6 सप्टेंबर 1949 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील रोशनलाल नागरथ हे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक होते. त्यांच्या वडिलांच्या नावावरूनच त्यांनी आडनाव 'रोशन' स्वीकारले आणि पुढे मुलगा हृतिक रोशनलादेखील तेच आडनाव लावलं. या कुटुंबाने चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान आजही प्रेक्षक विसरू शकत नाहीत.
शिक्षण आणि कुटुंब
राकेश रोशन यांनी प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल, महाराष्ट्रातून पूर्ण केलं. पुढे त्यांनी चित्रपटसृष्टीत करिअर घडवताना आपली व्यक्तिगत आयुष्यही सुंदर उभारलं. त्यांचे लग्न चित्रपट दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांच्या मुलगी पिंकीसोबत झालं. त्यांना मुलगा हृतिक रोशन आणि मुलगी सुनयना रोशन अशी दोन मुलं आहेत. आज मुलगा हृतिक जगभरात लोकप्रिय असून मुलगी सुनयना देखील चित्रपटसृष्टीशी निगडित काम करते.
अभिनयातून सुरुवात
1970 मध्ये 'घर घर की कहानी' या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. पण नायक म्हणून त्यांना फारसं यश मिळालं नाही. सहाय्यक भूमिकांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फारसं रंगलं नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नायक म्हणून लागणारी चमक होती, पण बॉक्स ऑफिसवर चित्रपट चालला नाही की नाव टिकणं अवघड जातं, हे त्यांचंही वास्तव ठरलं.
निर्माता म्हणून कारकीर्द
1980 मध्ये त्यांनी स्वतःची निर्मिती कंपनी स्थापन केली. 'आप के दिवाने' हा पहिला चित्रपट होता पण तो अपयशी ठरला. पण दोन वर्षांनी 1982 मध्ये आलेला 'कामचोर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. हा चित्रपट एका आळशी तरुणाची कथा होती. जो आयुष्यात शॉर्टकट शोधत श्रीमंतीच्या मागे लागतो आणि त्यातून नातेसंबंधांची किंमत विसरतो. या चित्रपटात त्यांच्या सोबत अभिनेत्री जया प्रदा दिसली होती आणि दोघांची जोडी त्याकाळी खूप लोकप्रिय ठरली.
दिग्दर्शक म्हणून नवे पर्व
अभिनय आणि निर्मितीनंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. 'खुदगर्ज' हा त्यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट होता. 'किशन कन्हैया', 'करण अर्जुन' सारखे हिट चित्रपट त्यांनी प्रेक्षकांसमोर आणले. त्यांच्या दिग्दर्शनाची वेगळी शैली होती, जी प्रेक्षकांना भावली.
मुलासोबतच्या चित्रपटांची कमाल
2000 मध्ये त्यांनी आपल्या मुलाला, हृतिक रोशनला 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून लाँच केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आणि हृतिकला रातोरात सुपरस्टार बनवून गेला. त्यानंतर 2003 मध्ये आलेला 'कोई मिल गया' हा चित्रपटही हिट ठरला. क्रिश, क्रिश 3 या चित्रपटांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.