ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीही सुबोधच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुबोधला शुभेच्छा देत मिश्किलपणे असं काही म्हटलं की त्याची चर्चा रंगली आहे. सचिन पिळगांवकर म्हणाले, "सुबोध माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा स्तंभ आहे. कारण मी त्याचा नेहमी आभारी ऋणी राहीन, कारण कोणीही विचार केला नसता तो विचार त्याने केला आणि मला कट्यार काळजात घुसलीसाठी त्या रोलसाठी घेतलं. आयुष्यभरासाठी माझ्यासाठी एक मोठंसं काम करून गेला तो. तुझ्या या करेजची मी दाद देतो. मी आयुष्यभर तुझा एहसानमन ( ऋणी ) राहिन."
advertisement
"आता तर तुझ्या करिअरचे 25 वर्ष झाले, तुझ्या आयुष्याचे 50 वर्ष झाले. आम्हाला तुझ्या करिअरची 50 वर्ष सेलिब्रेट करायला आवडतील. ती तू करावी, आम्ही त्या सेलिब्रेशनला सुद्ध येऊ. तुझ्या करिअरची 50 वर्ष जेव्हा होतील तेव्हा अर्थातच तुझी दोन्ही मुलं खूप मोठी झालेली असतील. त्यांनी त्यांचं खूप मोठं नाव कमावलेलं असेल यात मला शंका नाही. तुझ्या दोन्ही मुलांपैकी कोणत्याही एका मुलावर मी बायोपिक करेन, पण रोल तू करणार. कारण तेव्हासुद्धा तू तितकाच पॉप्युलर असणार आहेस. अनेक आशीर्वाद आणि खूप खूप प्रेम."
सचिन पिळगांवकर यांच्या या बोलण्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. सचिन यांनी सुबोधला शाल देऊन त्याला हातात विठ्ठलाची मूर्ती दिली. त्याबरोबर प्रेमाने आणलेलं एक खास गिफ्टही दिलं. सुबोधच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेते अशोक, सचिन पिळगांवकरांबरोबर मराठीतील अनेक कलाकार मंडळी होतीच पण त्याचा वाढदिवस आणखी एका कारणासाठी खास ठरला. राजकीय नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनीही सुबोधच्या वाढदिवसाच्या दिवशी खास हजेरी लावली होती. ठाकरे बंधू यावेळी पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
