TRENDING:

Sai Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याचा खरा फोटो आला समोर, कोण आहे तो?

Last Updated:

Sai Ali Khan Attacked: सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बायलाईन - अजित मांढरे
सैफ अली खान प्रकरणी मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
सैफ अली खान प्रकरणी मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
advertisement

Sai Ali Khan Attacked: गेल्या दोन दिवसांपासून सगळीकडे सैफ अली खान हल्लाप्रकरणाची चर्चा सुरू आहे. १६ जानेवारीला मध्यरात्री दोनच्या सुमारास एका अज्ञात इसमाने सैफवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात सैफ गंभीररित्या जखमी झाला असून त्याला तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी सतत वेगवेगळ्या अपडेट्स समोर येत आहेत.

advertisement

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याचा तपास वेगाने सुरू असून या प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणात एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याची कसून चौकशी सुरू असताना आता आणखी एक जण मध्य प्रदेशातून उचलला आहे.

सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आता या संशयिताची चौकशी होईल. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 50 जणांची चौकशी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी आता ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आकाश कन्नौजिया असल्याचं सांगितलं जात आहे.

advertisement

Tejashree pradhan : तेजश्री प्रधानने अपूर्वा नेमळेकरमुळे सोडली 'प्रेमाची गोष्ट' मालिका? या गोष्टीमुळे शंकेची पाल चुकचुकली 

सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयिताला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. संशयित आकाश कन्नौजिया हा ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने रायपूरकडे जात होता. दुर्ग स्टेशनवर पोहोचताच आरपीएफने त्याला ताब्यात घेतले. ही संशयित व्यक्ती जनरल बोगीमधून प्रवास करत होती. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरपीएफने कारवाई करत या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. दुर्ग आरपीएफने संशयिताला ताब्यात घेतले असून त्याला आरपीएफ स्टेशनमध्ये ठेवण्यात आले होते. मुंबई पोलीस रात्री उशिरापर्यंत दुर्ग मध्ये दाखल होणार असून तेव्हा त्या संशयीताला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले जाण्याची शक्यता आहे.

advertisement

सैफची तब्येत आता कशी आहे?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या शरीरावर चाकूने सहा वेळा वार करण्यात आले. यातील दोन वार त्याला खूप खोलवर लागले. ज्यामुळे सैफची सर्जरी करावी लागली. डॉक्टरांनी त्याच्या हाडांमध्ये अडकलेला चारू बाहेर काढला. लीलावती हॉस्पिटलचे सीईओ डॉ. नीरज उत्तमनी यांनी सांगितलं, “शुक्रवारी सैफ अली खानला आयसीयूमधून स्पेशल रूममध्ये दाखल करण्यात आलं. आता तो ठीक असून त्याला रिकव्हर व्हायला आणखी दोन-तीन दिवस लागतील. सैफला सोमवारपर्यंत डिस्चार्ज मिळू शकतो.”

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Sai Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याचा खरा फोटो आला समोर, कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल