TRENDING:

Saif Ali Khan Attack : अखेर सापडला सैफवर हल्ला करणारा, 1081 किमी अंतरावर पोलिसांनी असं पकडलं!

Last Updated:

Saif Ali Khan Attack Case Update : या हल्ला प्रकरणातील आरोपीला कसे पकडले याबाबत स्वतः डीजी मनोज यादव यांनी सांगितलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Saif Ali Khan Attack : अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या गंभीर हल्ल्याचा तपास वेगाने आहे. दरम्यान, या प्रकरणी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या हल्ला प्रकरणात एका संशयिताला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याची कसून चौकशी सुरू असतानाच एका संशयिताला मध्य प्रदेशातून उचललं आहे.
या हल्ला प्रकरणातील आरोपीला कसे पकडले याबाबत स्वतः डीजी मनोज यादव यांनी सांगितलं आहे.
या हल्ला प्रकरणातील आरोपीला कसे पकडले याबाबत स्वतः डीजी मनोज यादव यांनी सांगितलं आहे.
advertisement

सैफ अली खान प्रकरणी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. आता या संशयिताची चौकशी होईल. दरम्यान, मुंबई पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 50 जणांची चौकशी केली आहे. अशातच, पोलिसांनी आता ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचं नाव आकाश कन्नौजिया असल्याचं सांगितलं जात आहे.

Sai Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मारेकऱ्याचा खरा फोटो आला समोर, कोण आहे तो? 

advertisement

दरम्यान, या आरोपीला कसे पकडले याबाबत स्वतः डीजी मनोज यादव यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “मुंबई पोलिस या संशयिताचं लोकेशन ट्रॅक करत होती. त्यांना माहिती मिळाली की हा इसम ट्रेनमध्ये असून ही ट्रेन दुर्ग आणि राजनंद गावाच्या आजूबाजूला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती मध्य प्रदेश पोलिसांना दिली.”

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

डीजी मनोज यादव पुढे म्हणाले, “सिव्हिल कपड्यांतच मुफ्ती स्थानकात पोलिस या ट्रेनमध्ये चढले. दुर्ग पोलिस स्थानकातील एसएचओ यांनी या संशयिताला ओळखले आणि आपल्या दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. यानंतर आम्ही या इसमाचा फोटो घेऊन तो मुंबई पोलिसांसोबत शेअर केला. त्यांनीही या संशयिताची ओळख पटवली.”

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Saif Ali Khan Attack : अखेर सापडला सैफवर हल्ला करणारा, 1081 किमी अंतरावर पोलिसांनी असं पकडलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल